गुलमोहरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील छोट्या चिमुकल्यांचा मोठा कलाविष्कार
केत्तूर (अभय माने) प्रजासत्ताक दिनाचे (26 जानेवारी) औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुलमोहरवाडी (ता.करमाळा) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त चिमुकल्यांचा कलाविष्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अंगणवाडी पासून ते इयत्ता चौथी मधील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेत राजे छत्रपती शिवराय गीत,गवळणी,भक्तीगीते,भोंदूबाबा गीत,मिक्स डान्स,कॉमेडी ,मराठी,हिंदी गाणी,आकर्षक विविध वेशभूषा परिधान करत उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांनी सुंदर कलेचे सादरीकरण केले.कलागुणांना वाव देत पालक कौतुकांची थाप देते मोठ्या प्रमाणात बक्षिसे दिली.
हेही वाचा – परांडा येथे झालेल्या एसटी अपघातात पारेवाडी येथील तात्या पाटणे यांचा मृत्यू
उमरडचे प्रा.नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार प्रदान
यामध्ये माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन पिंपरे सहशिक्षक, विनोदकुमार भोसले आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी पालक, समस्त ग्रामस्थ व अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
छायाचित्र-गुलमोहरवाडी : आपली कला सादर करताना विद्यार्थी वर्ग