*परांडा येथे झालेल्या एसटी अपघातात पारेवाडी येथील तात्या पाटणे यांचा मृत्यू*
केत्तूर (अभय माने) परंडा (जिल्हा धाराशिव) वरून करमाळ्याकडे येत असताना परंडा जवळ एसटी बस झाडाला धडकून झालेल्या अपघातात 8 प्रवासी जखमी तर एक ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
मृत्यू पावलेली व्यक्ती करमाळा तालुक्यातील पारेवाडी गावातील अजून त्याचे नाव तात्या विरभद्र पाटणे ( वय 67 ) असे आहे.
पाटणे हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी परंडा येथे गेले होते. आज सकाळी सोमवार (ता.27) नऊ वाजता गावाकडे पारेवाडी ( ता.करमाळा) येथे येत असताना एसटी बस झाडाला धडकून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – वीट ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री हेमंत आवटे यांची बिनविरोध निवड
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर येथून पाटणे हे शिपाई पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे पश्चिम पत्नी, दोन विवाहित मुली ,नातवंडे असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या एकुलता एका मुलाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.