सोलापूर जिल्हा सोलापूर शहर

“यळकोट, यळकोट, जय मल्हार” नारा देत तरुणाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांवर उधळला भंडारा; धनगर आरक्षण मुद्दा पेटणार!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

“यळकोट, यळकोट, जय मल्हार” नारा देत तरुणाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांवर उधळला भंडारा; धनगर आरक्षण मुद्दा पेटणार!

सोलापूर (प्रतिनिधी);  सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. शंकर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी शंकर बंगाळे सोलापूरच्या विश्रामगृहावर विखे-पाटलांची भेट घेण्यासाठी आला. आपल्याला विखे-पाटील यांच्याकडे धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी शंकर बंगाळे याला विखे-पाटलांना भेटून देण्याची परवानगी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठरल्याप्रमाणे शंकर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर विखे-पाटील हे निवेदन वाचत असताना शंकर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे-पाटलांच्या डोक्यावर रिता केला.

यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या. यावेळी विखे-पाटलांच्या डोक्यावर सर्वत्र भंडारा पसरला होता.

हा प्रकार बघताच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकांनी तातडीने शंकर बंगाळे याला पकडले. या सगळ्यांनी शंकर बंगाळे याला खाली पाडून थोडीफार मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शंकर बंगाळे याला ताब्यात घेतले. शंकर बंगाळे याने यापूर्वीही असाच प्रकार केला होता. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात शंकर बंगाळे याने सोलापूर येथील सभेत तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा शंकर बंगाळे यांनी अशीच कृती केली आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. मात्र, या घटनेमुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!