माढासोलापूर जिल्हा

राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नावलौकिक कमावला – उपाध्यक्ष सज्जनराव जाधव आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नावलौकिक कमावला – उपाध्यक्ष सज्जनराव जाधव

आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा सत्कार

माढा / प्रतिनिधी- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या व प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली आहे.त्यांच्या अभ्यासू,परखड, निर्भिड,वाचनीय व वस्तुनिष्ठ लेखणीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.आज पत्रकारितेच्या क्षेत्रात भयंकर स्पर्धा आहे तरीही त्यांनी स्वकर्तृत्वाने पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख आणि नावलौकिक कमावला असल्याचे गौरवोद्वार राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव यांनी काढले.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे राजेंद्र गुंड यांना खैराव येथील श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल अंजनगाव खेलोबा व विठ्ठलवाडी ग्रामपंचायत आणि मित्रमंडळींच्या वतीने सत्काराच्या वेळी बोलत होते.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन तथा डीसीसी बँकेचे शाखाधिकारी अनिलकुमार अनभुले म्हणाले की,पत्रकार राजेंद्र गुंड यांनी मानेगाव परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांना वेळोवेळी लेखनीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या भागातील विविध रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने लेखनीतून प्रयत्न व पाठपुरावा केला आहे.या भागातील सर्व प्रकारच्या बातम्यांना स्थान देण्याची त्यांची भूमिका असते.त्यांनी मागील नऊ वर्षांपासून मानेगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव, स्थानिक पुढारी,कार्यकर्ते व विविध चळवळीत काम करणाऱ्या लोकांना पेपरमध्ये संधी दिली आहे.त्यांनी लेखणीतून मांडलेले अनेक सामाजिक विषय वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. भविष्यातही त्यांनी अशाच प्रकारे लेखनीतून सर्वसामान्य जनता व कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या मांडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव-2024” पुरस्कार कमलाकर दावणे यांना प्रधान

यावेळी अंजनगाव खेलोबाचे सरपंच प्रतिनिधी प्रदीप चौगुले,विठ्ठलवाडीचे माजी सरपंच बालाजी गव्हाणे,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष विनायक चौगुले, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,अंकुश लटके,सौदागर गव्हाणे,वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे,दिनेश गुंड, कैलास सस्ते,दत्तात्रय काशीद, शांताबाई गुंड मेघना गुंड,मेघश्री गुंड,क्षितिजा गुंड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

फोटो ओळी -विठ्ठलवाडी ता.माढा येथे आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष सज्जनराव जाधव, चेअरमन अनिलकुमार अनभुले, प्रदिप चौगुले,बालाजी गव्हाणे व इतर मान्यवर.

litsbros