करमाळासोलापूर जिल्हा

बौद्ध,मातंग,चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते जाणार; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बौद्ध,मातंग,चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते जाणार; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी); माता रमाई जयंती, संत रविदास महाराज जयंती व लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा यांचे वतीने पश्चिम महाराष्ट्र स्तरीय बैध्द मातंग चर्मकार ऐक्य परिषदेसाठी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते नेणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली आहे.

ही परिषद 26 फ्रेब्रुरवारी 2023 रोजी रात्री सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे होणार आहे. या परिषदेचे उदघाटन सोलापूरचे विचारवंत प्रा.डॉ. संघप्रकाश दुड्डे यांच्या हस्ते तर परिषदेचे अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय आध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत.

या परिषदेच्या विद्वान, कर्तुत्ववान, माणसे नसले तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवी, विद्येचा तुडवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सोलापूर, १४ जाने. १९४६) एक गंभीर चर्चा या विषयासह इतर महत्वाच्या विषयावर प्रा.डॉ. विलास खरात, विजयराज सेगेकर,अॅड. राहुल मखरे, विकास पाथरीकर, गोरख वेताळ हे मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून बामसेफचे दीपक देवाळकर, आरपीआयचे नागेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश कांबळे, डोमेट्रिक पार्टीचे सोहन लोंढे, चर्मकार महासंघाचे विनायक भगत, लहुजी शक्ती सेनाचे सुधाकर पाटोळे, फादर योहान कानेपागुल, डॉ. कुमार लोंढे, बाळासाहेब राखपसारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – उर्जामंत्र्याना खरच शेतकरी कळवळा असेल तर राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी मान्य करावी; करमाळा तहसीलदारांना देऊनही

करमाळा तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा कायम; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या शाखेचे उद्घाटन

यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी करमाळा तालुका युनिटच्या वतीने विविध गावातून कार्यकर्त्यांसह काॅर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीतून जनजागृती करण्याचे काम चालू आहे.

त्यास सर्व स्तरातील कार्यकर्त्यांसह नारीकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन गौतम खरात यांनी केले आहे.

litsbros

Comment here