करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

कणेरी मठातील मृत गायींचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेले पत्रकारावर हल्ला करणार्‍यांना तत्काळ अटक करा; करमाळा तालुका पत्रकार संघाची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कणेरी मठातील मृत गायींचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेले पत्रकारावर हल्ला करणार्‍यांना तत्काळ अटक करा; करमाळा तालुका पत्रकार संघाची मागणी

करमाळा (प्रतिनिधी); कणेरी मठातील मृत गायींचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेले पत्रकार भूषण पाटील यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी करमाळा तालुका पत्रकार संघाने याबाबत निषेध व्यक्त केला आहे.

गोकुळ शिरगाव पोलिसात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलम चार खाली काल रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम अजामीनपात्र असून गुन्हा सिध्द झाल्यानंतर तीन वर्षांच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद त्यात आहे.. या कलमा शिवाय भादवि कलम ३२३, ५०४, ५०६ ही कलमं आरोपीवर लावली गेली आहेत.

घटना घडल्याचे समजताच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी भूषण पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती घेत, “आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास” दिला.. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क करून पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर रात्री गुन्हा दाखल झाला. परिषदेने निषेधाचे पत्रक देखील काढले.

हेही वाचा – कष्टकरी शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू – चेअरमन रणजितसिंह शिंदे दारफळ सीना येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात हजारो शिवचरित्रांचे वाटप करून पुरोगामी विचारांचा जागर करणारी शिवजयंती संपन्न; सर्वत्र चर्चा

या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे केली आहे..पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील घटनेचा निषेध केला आहे.

आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करमाळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश चिवटे तसेच त्यांच्या पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

litsbros

Comment here