करमाळा

करमाळा तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा कायम; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या शाखेचे उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा कायम; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या शाखेचे उद्घाटन

करमाळा(प्रतिनिधी); मागील काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये ठाकरे गट व शिंदे गट अशा दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची? हा प्रश्न निर्माण झाला होता. कालच निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण शिंदे यांना दिल्याचे सांगितले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील गावागावात उद्धव ठाकरे यांच्यावरच शिवसैनिकांचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे.

त्याचाच प्रत्यय करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेची पहिली शाखा उद्घाटन करण्यात आले यातून येत आहे. असे जनतेत बोलले जात आहे.

युवासेना विस्तारक उत्तमजी आयवळे, जिल्हा प्रमुख सचिन बागल यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, संघटक संजय शिंदे, शहरप्रमुख प्रवीणजी कटारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सोगाव (प) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली.


या कार्यक्रमास युवासेना तालुका समन्वयक उपसरपंच पांडुरंग ढाणे, उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे, हणुमंत रंदवे उपस्थित होते. युवा सेना शाखाप्रमुख पदी ओकांर कोठारे तर उपशाखाप्रमुखपदी मयुर तावरे, खजिनदारपदी विशाल नवगण, सचिवपदी समाधान गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली.

माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, संघटक संजय शिंदे ,शहरप्रमुख प्रवीण कटारीया तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली बोराडे,जनार्धन पाखरे,सोमनाथ कोठारे, सुमित तावरे,समाधान भोसले,तुषार शिंदे, सौरभ राऊत, सचिन काळे,वैभव गोसावी, योगेश नगरे,ज्ञानेश्वर राऊत, करण नगरे,विजय राऊत, अनिकेत नवगण, चंद्रकांत पाठक, शुभम कदम आदिंनी परीश्रम घेतले.

यावेळेस गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ युवासैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुत्रसंचालन ओकांर कोठारे तर आभार सुमित तावरे यांनी मानले

litsbros

Comment here