*आवाटी जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात*
केत्तूर (अभय माने) भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवाटी (ता.करमाळा) मराठी आणि उर्दू शाळेचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर आवाटी गावच्या सरपंच तब्बसूम खान आणि उपसरपंच गोपीनाथ सोनवर यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आवाटी मराठी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नलवडे आणि आवाटी उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजूभाई खान उपस्थित होते .यावेळी दोन्ही शाळेतील मुला मुलींनी देशभक्तीपर गीते लोकनृत्य हिंदी गाणी तसेच मराठी गीतांवर नृत्य सादर केली.
हेही वाचा – काॅफीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाचा आता नवा पॅटर्न;पॅटर्न मुळे काॅफिला बसणार आळा
खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे – उदयसिंह मोरे पाटील
या कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ पालक युवक वर्ग आणि विशेष करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी खाऊ वाटप झाल्यानंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
छायाचित्र- स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर