*खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे – उदयसिंह मोरे पाटील*
केत्तूर (अभय माने) विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासाठी व आरोग्य आरोग्य सदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे व गरजेचे आहेत याबरोबरच स्पर्धेमध्ये भाग घेतलेला खेळाडूमध्ये खिलाडू वृत्ती असली पाहिजे.नवीन पिढी मोबाईलमध्ये गुंतली असून दंग झाली आहे ही दुर्दैवी बाब आहे.विद्यार्थ्यांनी मैदानावर विविध खेळाचे खेळ खेळले पाहिजेत.असे मत केत्तुरचे माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील यांनी व्यक्त केले.
नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर नं.2 (ता.करमाळा) येथे विवेकानंद जयंती क्रीडा सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यावेळी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी
या सप्ताहात सर्व गटातील मुला- मुलींच्या कबड्डी,खो-खो,क्रिकेट व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या.यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.प्राचार्य काशिनाथ जाधव म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक,बौद्धिक,भावनिक विकास होण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.
यावेळी स्पर्धेचे नियोजन किशोर जाधवर,संग्राम जाधव,रामचंद्र मदने व इतर शिक्षकांनी केले.
छायाचित्र- केत्तूर-कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना उदयसिंह मोरे पाटील व खेळाडू