करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकाचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकाचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी

करमाळा(प्रतिनिधी); हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेली तीन ते चार दिवसापासून करमाळा शहर तसेच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

त्यानुसार आज अवकाळी पावसाचा तडाका करमाळा शहर तसेच परिसरात बसला करमाळा शहर तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी तसेच जेऊर सह परिसरात आज संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली आहे गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते दिवसभर प्रचंड उष्मा जाणत होता.

संध्याकाळी सात वाजण्याची असुमारास करमाळा शहरात व परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली तर जेऊर व परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले ज्वारीचे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसाने ज्वारीच्या कणसे भिजल्याने ज्वारीवर काळी ठिपके पडण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे याबरोबरच कापणी राहिलेले हरभऱ्याचे पीक तसेच काढून पडलेली ज्वारी याचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंदाधुंद व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी कुटुंबासहीत करणार करमाळा तहसील समोर आत्मदहन

आवाटी येथील विधीज्ञ ॲड.अलीम पठाण यांचा ‘कर्तव्यनिष्ठ वकील’ म्हणून कृषी महोत्सवात नागराज मंजुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन झाला सन्मान

या पावसाने गेल्या खरीप हंगामा मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसताना आता पुन्हा हाता तोंडाशी आलेल्या व निसावलेल्या ज्वारीचे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग हातबल आहे.

litsbros

Comment here