करमाळासोलापूर जिल्हा

आमदार संजय मामा शिंदे ज्या रस्त्याने करमाळयाला जातात त्या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नाही? जनशक्ती संघटनेचा सवाल; ‘श्रमदान’ करून करणार ‘आंदोलन’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आमदार संजय मामा शिंदे ज्या रस्त्याने करमाळयाला जातात त्या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नाही? जनशक्ती संघटनेचा सवाल; ‘श्रमदान’ करून करणार ‘आंदोलन’

करमाळा(प्रतिनिधी);
माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. हा रस्ता माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग असून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी असणारे संजय शिंदे निधी उपलब्ध करू शकत नाहीत म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने श्रमदान करून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिले आहे.

माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्तावर भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठ मोठे दगड गोटे आले आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना तारेवरची कसरत करत रस्त्याने प्रवास करावा लागतो.

खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. शेतकरी, दूधवाले, विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. इतकी दयनीय परिस्थिती असताना देखील मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजय शिंदे रस्त्यासाठी निधी उपलब्ध करू शकत नाहीत. त्यांना देखील या रस्त्याने येताना जाताना मोठी तारांबळ उडते.

यासाठी जनशक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.२४ मार्च रोजी श्रमदान करून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा – भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंदाधुंद व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी कुटुंबासहीत करणार करमाळा तहसील समोर आत्मदहन

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागांची भरती सुरू; करमाळा तालुक्यातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

आमदार संजय शिंदे हे करमाळा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत. याच रस्त्यावरून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांचा प्रवास होतो. जो आमदार स्वतःच्या राहत्या गावापासून मतदार संघात जायला रस्ता करू शकत नाही तो आमदार विधानसभा मतदारसंघाचा काय विकास करणार..?

अतुल खूपसे पाटील
संस्थापक, जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

litsbros

Comment here