करमाळा येथील शासकीय कर्मचा-यांच्या जुनी पेन्शन आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा
करमाळा (प्रतिनिधी);
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार करमाळा या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचा-यांचे आंदोलन व संप चालू आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
हे पत्र संपकरी प्रतिनिधी तात्यासाहेब जाधव जिल्हा प्रसिद्ध प्रमुख जुनी पेन्शन योजना संघटना
साईनाथ देवकर जिल्हा कार्याध्यक्ष जुनी पेन्शन योजना संघटना अरुण चौगुले तालुका अध्यक्ष जुनी पेन्शन योजना संघटना,सतिश चिंधे तालुका कार्याध्यक्ष या प्रतिनिधी कडे पाठिंब्याचे पत्र देण्यात आली.
या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभष ओव्हाळ, जिल्हा संघटक विलास कांबळे जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, शहर अध्यक्ष विशाल लोंढे, शहर उपाध्यक्ष यशवंत कांबळे, शहर उपाध्यक्ष जितेश रणबागुल, शहर सचिव राजु सय्यद, शहर सदस्य सुजित कांबळे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comment here