करमाळा क्राइम सोलापूर जिल्हा

दहिगाव उपसा सिंचन योजना अनाधिकृत सायपन विरुद्ध कारवाईला अडथळा करणाऱ्या खडकेवाडी येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दहिगाव उपसा सिंचन योजना अनाधिकृत सायपन विरुद्ध कारवाईला अडथळा करणाऱ्या खडकेवाडी येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (प्रतिनिधी); दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असून गेल्या 7 दिवसापासून हे आवर्तन टेल चारी वरील घोटी या गावासाठी सुरू आहे.

परंतु कुंभेज येथील पंप गृहापासून शेवटच्या टेल पर्यंत मुख्य कॅनॉल वरती कोणतीही शासकीय परवानगी न घेता अनाधिकृत पणे असंख्य सायफन व इलेक्ट्रिक पंप द्वारे बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे टेल चारी वरील घोटी गावाला 6 दिवस कसरत करूनही पाण्याचा थेंबही मिळालेला नाही.

त्यामुळे त्या गावाला पाणी मिळावे या उद्देशाने कुंभेज पंप हाऊस पासून पुढील 8 किलोमीटर पर्यंत कॅनॉल च्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना 10 दिवस अनधिकृत मोटारी बंद करा व सायफण कायमस्वरूपी बंद करा असे आवाहन दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांकडून केले जात होते.

या आव्हानाला प्रतिसाद न देता उलट आमच्या मोटारी का बंद करता ? सायफण का काढता ? असे म्हणत सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी खडकेवाडी येथील प्रवीण छगन शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अशी माहिती कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे उपविभागीय अधिकारी श्री. एस. के. अवताडे यांनी दिली. सदर आरोपी वरती भारतीय दंड संहिता 1860 कलम 353, 341, 427 ,504 व 506 या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

 

सायफण चालविणाऱ्या विरुद्ध सरसकट गुन्हे दाखल करणार

यापूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉल वरून सायफण द्वारे पाणी उचलणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन, ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती नोटीस डकवून तसेच वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्धी देऊन सायफण द्वारे पाणी उचलणे हा गुन्हा असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे तरीसुद्धा असंख्य शेतकरी आजही सायफण द्वारे पाणी उचलत आहेत.

त्याविरुद्धची कारवाई आज 25 ऑक्टोबर रोजी अधिक कडक केली असून महेश आजिनाथ तनपुरे , विशाल पाटील, राहुल मस्कर ,दत्तात्रय किसन आडेकर, अतुल सौदागर वाघमारे आदी व्यक्तीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तक्रार दाखल केलेली असून सायफण विरुद्धची कारवाई अधिक कडक केली जाणार आहे.

आज दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी गुळसडी ते घोटी यादरम्यान असंख्य सायफण व अनाधिकृत इलेक्ट्रिक पंपावरती कारवाई केलेली असून इथून पुढे सदर पंप किंवा सायफण चालू दिसल्यास सदर व्यक्ती वरती सरसकट गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती एस.के .अवताडे यांनी दिली.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!