करमाळाराजकारण

मोठी बातमी- करमाळा तालुक्यातील ‘या’ ५१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका डिसेंबर मध्ये होणार; प्रभाग रचना जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ ५१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका डिसेंबर मध्ये होणार; प्रभाग रचना जाहीर

करमाळा माढा न्यूज; कोरोना लॉकडाऊन प्रक्रिया थांबल्यानंतर शासनामार्फत सर्व बाबी हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियाही गतिमान झालेल्या आहेत. करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रभाग रचना जाहीर केली आहे. लवकरच मतदार यादी जाहीर केली जाणार असून येत्या आठ दिवसात सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत निघणार आहे.

15 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक जाहीर होऊन येत्या 10 ते 12 डिसेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे. करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीचा कार्यकारिणीचा कालावधी पूर्वीच संपलेला आहे. लॉकडाऊनमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे काही ग्रामपंचायतीचे कारभार प्रशासकाकडे देण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यातील खालील 51 ग्रामपंचायतीचा समावेश…

देवीचामाळ, वडगाव, पुनवर, देवळाली, बोरगाव, बिटरगाव श्री, पोथरे, भोसे, रोशेवाडी, जातेगाव, पिंपळवाडी, सावडी, उमरड, शेटफळ, कुगाव, केडगाव, अर्जुननगर, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पोटेगाव, बाळेवाडी, घारगाव, फिसरे, करंजे, कोळगाव, दिलमेश्वर, कुंभेज, सरपडोह, गुळसडी, ढोकरी, जेऊरवाडी, कोंढेज, झरे, शेलगाव(क), सौंदे, हिवरे, निमगाव(ह), साडे, सालसे, आळसुंदे, नेरले, हिसरे, पांगरे, पाथर्डी, सांगवी, मलवडी, कविटगाव, हिवरवाडी, मांगी, आळजापूर, या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

त्यानुसार करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. पुढील महिन्यात या निवडणुकीचे मतदान होणार आहे. असे असलेतरी एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतीचे मतदान होणार की टप्प्या टप्प्याने होणार हे अद्याप समजलेले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनूसार 10 नोव्हेंबरच्या आसपास ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

तसेच मतदार यादीही लवकरच जाहीर केली जाणार आहे. याशिवाय 15 नोव्हेंबर नंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून येत्या 10 ते 12 डिसेंबरच्या दरम्यान पहिल्या टप्प्यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत शासनाची निवडणुक यंत्रणा गतिमान झालेली आहे.

litsbros

Comment here