करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा शहरात महाराणा प्रताप पुतळा सुशोभिकरण व रजपूत बांधव समाजमंदीर उभारण्यासाठी खासदार निधीची मागणी; खा.नाईक निंबाळकर यांना दिले निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात महाराणा प्रताप पुतळा सुशोभिकरण व रजपूत बांधव समाजमंदीर उभारण्यासाठी खासदार निधीची मागणी; खा.नाईक निंबाळकर यांना दिले निवेदन

करमाळा(प्रतिनिधी); शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यां पैकी मंगळवार पेठेतील शहरवासियांचे श्रध्दास्थान असलेले क्षत्रीय महाराणा प्रताप यांच्या देखण्या पुतळ्याजवळ नगरपालिकेची मोठी खुली जागा आहे . पुतळ्या जवळचे कंम्पाऊंड छोटे असल्या कारणाने रजपूत बांधवांच्या सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांकरिता सदर जागा अपूरी पडत आहेत . तसेच पुतळ्याचेही सुशोभिकरण करणे गरजेचे आहे.

रजपूत बांधवांचे धार्मिक हित जोपासणे करता किमान १० लाख रु . निधी उपलब्ध करावा या मागणीसाठी तसेच सुतार गल्ली येथे रजपूत समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहेत . त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या समाज मंदिराची गरज आहे . या परीसरातही नगर पालिकेची भरपूर मोकळी जागा आहे .

हेही वाचा – अकरा गुन्हात आरोपी असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास करमाळा येथून अटक; ५ लाखाचे दागिने ही हस्तगत, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी

दहावी निकाल – करमाळा तालुक्यात कु.शिवांजली राऊत प्रथम; तालुक्यात दहावीचा निकाल 93.55% यंदाही दहावीच्या निकालात मुलींचा डंका; क्लिक करून वाचा सविस्तर

त्या करिता किमान दहा लक्ष निधी मिळावा या मागणीचे निवेदन जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना दिले आहे .

यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयजी मिश्रा, जगताप गटाचे पश्चिम भागाचे नेते आण्णासाहेब पवार आदी उपस्थित होते .

litsbros

Comment here