दहावी निकाल – करमाळा तालुक्यात कु.शिवांजली राऊत प्रथम; तालुक्यात दहावीचा निकाल 93.55% यंदाही दहावीच्या निकालात मुलींचा डंका; क्लिक करून वाचा सविस्तर
जेऊर (प्रतिनिधी); तालुक्याचा दहावीचा एकुण निकाल ९३.५५ टक्के लागला आहे. तालुक्यातील एकूण 154 विद्यालयांतून 14 विद्यालयांतील 100 टक्के विद्यार्थी पास झाले असून शहरातील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची कु. राऊत शिवांजली महेश हिने 99.40 % गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
जेऊर येथील भारत हायस्कूलचा एकूण निकाल 93.18% लागला असून यामध्ये वाघमारे हर्षवर्धन पांडुरंग 97.20% याने प्रथम क्रमांक तर बडे विवेक सूर्यकांत 96.80% याने द्वितीय क्रमांक तर महमाने प्रथमेश याने 95.80% तृतीय क्रमांक तर कुमारी श्रीरामे तनवी दामाजी हिने 95.10% गुण मिळवीत भारत हायस्कूलमध्ये चौथा क्रमांक पटकाविला.
या हायस्कूलमध्ये एकूण 308 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यामध्ये 287 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच संस्थेची सचिव अर्जुन सरक यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या कु. शिंदे पायल जोतिराम हिने 95 % मार्क मिळवून दुसरा क्रमांक तर क्षीरसागर श्रावणी प्रकाश हिने 94.40 % गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेचा एकुण निकाल ९२.११% आहे.
महात्मा गांधी विद्यालय, करमाळाचा निकाल ९३.२६ लागला असून कु. केतकी गणेश कोरपे 97.20 % मिळवून प्रथम, कु. प्रणिती शिवाजी ढेरे 96.40 गुण मिळवून द्वितीय तर कु. उन्नती उत्कर्ष गांधी ही 96.20 % गुण मिळवून शाळेत तिसरी आली आहे.
श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश स्कूलचे १००% विद्यार्थी पास झाले असूनकु. दोशी प्राप्ती अनुप 93.40 % गुण मिळवून शाळेत प्रथम तर कु. काळे संस्कृती मनोज ९०.२० % गुण मिळवून शाळेत द्वितीय आणि कु. उदावंत प्राजक्ता प्रसाद त्याचबरोबर देशमुख निखिल नागेश यांनी 89.80 % गुण प्राप्त करत शाळेत तिसरा क्रमांक मिळवला आहे.
श्री कमलादेवी कन्या प्रशालेतील कु. मारडकर संजना अनिल 87.20% गुण मिळवून शाळेत प्रथम तर कु. होगले सानिका युवराज 83.00% गुण मिळवून शाळेत द्वितीय आणि कु. धनश्री विजय झोळे – 82.20% गुण मिळवून शाळेत तिसरी आली आहे. प्रशालेचा एकुण निकाल ९२.७५ % आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.
Comment here