करमाळासोलापूर जिल्हा

परीक्षेसाठी पुण्याला जाणारा करमाळा तालुक्यातील तरुण रेल्वेतून पडून जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

परीक्षेसाठी पुण्याला जाणारा करमाळा तालुक्यातील तरुण रेल्वेतून पडून जखमी

केत्तूर ( अभय माने) परीक्षेसाठी रेल्वेतून पुण्याला जाणाऱ्या तरुण चालत्या गाडीतून पडून जखमी झाल्याचा प्रकार शनिवार (दि .3) रोजी पारेवाडी जवळ घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की,भाळवणी (ता.करमाळा) येथील तरुण अवधूत धावरे (वय 27) हा युवक जेऊर येथून सोलापूर – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वे गाडीने पुण्याला परीक्षेला जाण्यासाठी निघाला होता.

मात्र प्रवास करीत असताना पारेवाडी – वाशिंबे दरम्यान चालत्या गाडीतून बाहेर पडल्याने तो जखमी झाला होता. क्रिकेट डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पारेवाडी येथिल नागरिकांना याची माहिती समजताच येथील नागरिकांनी त्याला साईडला घेतले व येथील रेल्वे मास्तर अमितकुमार व पॉईंट्समन आयुब शेख यांना माहिती दिली.

त्यानंतर रेल्वे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी त्या जखमी युवकास तात्काळ उचलून येथिल डॉ.दिलीप कुदळे या खाजगी दवाखान्यात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व भाळवणी येथे त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून पारेवाडी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर अवधूत यास त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

litsbros

Comment here