माढासोलापूर जिल्हा

कष्टकरी शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू – चेअरमन रणजितसिंह शिंदे दारफळ सीना येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कष्टकरी शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू – चेअरमन रणजितसिंह शिंदे

दारफळ सीना येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

माढा / प्रतिनिधी – माढा मतदारसंघातील गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.विविध जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारों हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. ऊसाला सातत्याने वेळेवर चांगला भाव दिला आहे.विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून सीना काठावरील क्षारपड जमिनीची दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.जिल्हा दूध संघाचे संकलन 17 हजार लिटर वरून 70 हजार लिटर झाले असून दूध उत्पादकांना नियमित व वेळेवर चांगले पेमेंट दिले जात आहे.येत्या दोन महिन्यात केवड परिसरात दूध संकलन व शीतकरण केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

ते दारफळ सीना ता.माढा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजनाच्या वेळी बोलत होते.

यावेळी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते मुस्लिम कब्रस्तानासाठी मंजूर 15 लाख निधीतून होणा-या सुशोभीकरण कामाचे,समाजमंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, भूमिगत गटार,घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

पुढे रणजितसिंह शिंदे म्हणाले की, दारफळ ग्रामस्थांनी वेळी केलेल्या मागण्यांची पूर्तता आम्ही केली आहे. दारफळ ते भोईजे रस्त्यासाठी 5 लाख निधी देण्याची ग्वाही दिली.मानेगाव गटातील विविध गावांमध्ये आनंद व इतर रस्ते मुरमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंजूर केलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामे विद्यमान शासनाने स्थगिती दिल्यामुळे रखडली आहेत.ती स्थगिती उठवण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात नागरी बँक्स असोसिएशनचे नूतन चेअरमन अशोक लुणावत म्हणाले की, मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी रणजितसिंह शिंदे यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. आ.बबनराव शिंदे व शिंदे कुटुंबीयांनी दारफळकरांना वेळोवेळी विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत.

प्रास्ताविक माजी उपसरपंच औदुंबर उबाळे यांनी केले.सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संतोष चव्हाण यांनी केले. आभार आनंद उबाळे यांनी मानले.

त्यावेळी सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच कुमार शिंदे ,चेअरमन विठ्ठल शिंदे,शहानवाज सय्यद,शाखा अभियंता मयुरी जावळकोटे,शिवाजी बारबोले,शिवाजी उबाळे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,प्रदीप कांबळे, नानासाहेब बागल,विजय शिंदे,रमेश चव्हाण,नागनाथ भुसारे,आबासाहेब उबाळे,ग्रामसेवक विजय शिरसाट, दत्तात्रय बारबोले,दीपक बारबोले, महादेव कांबळे,किशोर शिंदे,हरिदास गायकवाड,बाळासाहेब बारबोले, कुमार नवले,लक्ष्मण देवकुळे, काशिनाथ अनारसे,बबन घोडके यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – वंदे भारत एक्सप्रेस चालु झाली त्याचा आनंद; परंतु सर्वसामान्यांसाठी काय? आम्हाला तिकीट सुद्धा परवडणार नाही..

माढा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

यावेळी दारफळ गावचे सुपुत्र तथा माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांची सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दारफळ ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

फोटो ओळी- दारफळ ता.माढा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत, सरपंच अशोक शिंदे व इतर मान्यवर.

litsbros

Comment here