🌹🌹 हायवे वरचा ढाबा 🌹🌹
++++++++++++++++++++
आता मस आपण म्हणतो आणि तो म्हणण्यामध्ये एक प्रतिष्ठा…रुबाब…मनाचा मोठेपणा वाटतो कारण क्षणीक किंवा पायापुरता विचार करणारा वर्ग म्हणजे…आहे सधन पण उगाच फालतू खर्च नको अशा व्यवहारीक विचाराच्या दृष्टिकोनातून वागणारा वर्ग शक्यतो ढाबा हा प्रकार टाळतात आणि खरंच मानावं लागेल अशा विचारसरणीला बरं असो आपण जे म्हणतो ढाबा तर याचा सखोल विचार केला तर रोडने करायचा प्रवास साधारणपणे एखाद्या आठवड्याचा असेल तर घरून बांधून नेलेला डबा अथवा जेवण जास्तीत जास्त उद्यापर्यंत राहू शकते.
काही दिवसापूर्वी म्हणजे ट्रक रोडच्या कडेला म्हणजे ओढा किंवा नदीच्या आसपास रोड पासून एका बाजूला लावून तिथेच आंघोळ वगैरे उरकायची स्वतः स्वयंपाक करायचा आणि पूर्वी फक्त चहापाणी किंवा भजे वगैरे सारखे नाश्त्याचे हॉटेलं अस्तित्वात होती जेवणाचं पण हॉटेल असायचं पण रोडवर नसायचं कारण सर्वसाधारणपणे रोड पासून फर्लांग
भर क्वचितप्रसंगी एखाद्या किलोमीटर पर्यंत आत गावामध्ये लांब असायचं. लोक वस्तीत हॉटेल असायचं आणि ते गैरसोयीच वाटायचं पण त्यातीलच काही व्यवहारिक व धंदेवाईक दृष्टिकोनातून घरगुती टाईप रोडच्या कडेला झोपडी टाकून भाजी भाकरीची व्यवस्था करण्यात आली आणि याला ढाबा असं संबोधू लागले
या ढाब्याची उलाढाल पाहता या व्यवसायाने या क्षेत्रामध्ये चांगलेचं पाय स्थिरावले तर आता जरी आपल्या लोकांचे ढाबे अस्तित्वात असले तरीही मूळ संस्कृती आपल्या शीख समाजाची आणि त्यांची बैठक व्यवस्था ही शक्यतो टेबल खुर्ची अथवा बाकडं नसून काथ्याने विणकाम केलेल्या दहा वीस बाजा असायच्या त्यातील एका बाजेवर दोन तीन जण बसून समोरच्या बाजेवर आडवी फळी टाकलेली असायची आणि त्याच्यावर ताट आणि जेवणाचे पदार्थ ठेवले जायचे कदाचित ट्रक ड्रायव्हरचं क्षेत्र म्हणजे डोळ्यावर जागरणाचा ताण वेळेचं बंधन नाही आणि एकाग्रता त्यामुळे शारीरिक पेक्षा मानसिक श्रम जास्त असायचं त्यामुळे पोटभर जेवण झालं की डोळे जड व्हायचे त्यामुळे शक्यतो त्या बाजेवरच एक साधारण दोन तासाची वामकुक्षी घेऊन पुढील प्रवासासाठी नव्या दिमतीने तयार व्हावं लागायचं
तसं बघायला गेलं तर शीख समाजातील तरुणांचा सहभाग मुख्यत्वे करून लष्कर…शेती… आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात अधिक आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा परतीचा प्रवास करताना सुरक्षित अशा मुक्कामाच्या जागा व त्यांच्या विशिष्ट पद्धतीचे जेवण या ढाब्यामुळं त्यांना मिळू लागले ढाब्यावाला स्थानिक असल्यामुळे प्रवाशांना स्थानिक लोकांपासून वाटणारी असुरक्षितता किंवा भीती राहिली नाही हम रस्ते…महामार्ग आदी ठिकाणचा पंजाबी ढाबा म्हणजे ट्रक ड्रायव्हर साठी दुसरे घरच…खरंच ढाबा म्हणजे भन्नाट प्रकार दिवसातून सहा हक्काच्या बसेस थांबणार त्यात एक एम पी आणि बाकीच्या महाराष्ट्राच्या या बसेस मधून सरासरी 225 तरी प्रवासी या ढाब्यावर उतरणार त्यातल्या लेडीज 75 त्यापैकी 25 सोडल्या तरी बाकीचे दीडशे पावणे दोनशे लोक त्यांच्यामार्फत कमीत कमी सात हजाराची तरी विक्री व्हायची
कारण या गाड्या सहसा जेवणासाठी ढाब्यावर थांबायचा सहा कंडक्टर सहा ड्रायव्हर आणि एम पी चा ड्रायव्हर साधारणपणे ढाब्यावर जेवणार त्यांचं बिल नाही एवढं करून या गाड्या दुसऱ्या ढाब्यावर जाऊ नये म्हणून या 13 जणांना बिसलरी बाटल्या जेवण ही फुकट मिळणार म्हणजे ग्रुप मध्ये साधारण पार्टीचं म्हणायचं असं जेवण करायचं दोन चिकन हंडी म्हणजे 600 रुपये झाले बरोबर रोट्या नंतर भात…शाकाहारी मध्ये दाल तडका किंवा मटार पनीर…आलू मटार पनीर साधारण 130 रुपये प्लेट व रोट्या मिळून एकत्र कुटुंबाचे दोन हजार रुपयांचे बिल व्हायचे हे एका फॅमिली चे बिल एकंदर खर्च म्हणजे भांडवल वजा जाता ढाब्या वाल्याला साधारण आठ ते दहा हजार रुपये तरी सुटायचे तर तो ढाबे वाला पण असा बनलेला असायचा कारण त्याला मोकळा वेळ नसायचा ढाबा 24 तास चालू दोन-तीन जण आळी पळीने ढाबा सांभाळायचे काय आराम करेल तेवढ्याच फावला वेळ म्हणायचा काळ्या कॅरीबॅगमध्ये कागदाचा कचरा भरतो तसा या काळ्या कॅरीबॅगमध्ये वेड्या वाकड्या कोंबलेल्या अस्ता व्यस्ता अशा नोटा भरून त्या चार-पाच दिवसांनी घरी जाऊन निवांतपणे एकदा मोजायच्या असा सोहळा व्हायचा ही झालं इथपर्यंत…
आता अशा गडबडीत एक फिरत फिरत अबूबखर नावाची व्यक्ती त्या ढाब्यावर काम करण्याच्या निमित्ताने आली त्याची नॉनव्हेजची खासियत होती चव तर अशी की एकदा खाऊन गेलेला परत लवकरात लवकर ढाब्याकडे एका विशिष्ट ओढीनं यायचा कारण हा अबूबखर चिकन असो का मटन पहिल्यापासून पाण्याचा थेंब न वापरता भाजी बनवायचा ते थेट ताटात वाढेपर्यंत म्हणजे बघा अगोदरच वाटी दीड वाटी तेल…त्याच्यात कांदा…खडा मसाला… टोमॅटो… एकजीव करून ती मटन त्यात घालायचा पार बुडापासून ती मटन हलवायचा आणि झाकण ठेवायचा असं बार बार म्हणजे अर्धा तास सारखं करायचा प्रत्येक वेळी झाकण काढायचा मटन मुळापसनं हलवायचा आणि नंतरच्या पाहणीत सगळे मसाले…तिखट… मिरची… मीठ टाकायचा मूळतः अंगच्या सुटलेल्या त्या मटणाच्या पाण्यातच ती मटन शिजायचं अशी त्याची खासियत की जेवल्यावर लोकं पाचही बोटं आवर्जून चाटत असताना दिसायची
या ढाब्यावाल्यांचं व्यवस्थापन कौशल्य फारच जबरदस्त होतं कर्ज बिर्ज काढून पाच वर्षांपूर्वी काढलेलं कर्ज फिठलंही होतं एस टी वाल्यांपैकी चार पाच जणाला टेस्ट आवडली होती माऊथ टू माऊथ पब्लिसिटी झाली होती तीन गाड्या थांबायच्या तिथे सहा गाड्या थांबायला लागल्या आजूबाजूला गावामध्ये जाहिरात झाली सुका चिकन… चिकन फ्राय… मटन मुगलाई…या डिशेस लोकांमध्ये गाजल्या थंडगार वारा प्रशस्त जागा आवडते मित्र एखादी बाटली… चिकन किंवा मटन हंडी पब्लिक आता पार्टीसाठी लांबून येऊ लागलं नंतर जवळजवळ शेजारी असे दोन ढाबे झाले ढाबे पण चांगले असून आता गिऱ्हाईकंही मिळू लागलीत त्याचं कारण ते ढाबे एकेका गावाला बरेच जवळ असल्याने गावातील लोकांचं रात्रीचं जेवायला मुद्दामहून जास्तीच्या प्रमाणात यायचं प्रमाण वाढलं
पहाटं तीन ते दुसऱ्या दिवशी पहाटं तीन असं कामगारांचं ढाब्याचं टाइमिंग असायचं म्हणजे थोडक्यात 24 तास ड्युटी त्यात सकाळपासून रात्री सात पर्यंत तीन मुलं बाहेर अन दोन आत लागायचे त्यावेळेस एक बाहेरचा आणि एक आतला असे झोपायचे किंवा इतर काहीतरी करायचे शिफ्ट ठरवून ठेवलेल्या असायच्या ढाब्याला सुट्टी ही नसायची मालक साधारण रात्री दोन ला थोडंसं झोपायचा सकाळी साडेपाचला उठायचा दुपारी परत तासभर झोप काढायचा पोलीस…स्थानिक नेते… काही दादागिरी करणारे मोजकेच असतात… त्यांना खुश ठेवणे संपूर्ण खरेदी…बँक व्यवहार… सगळ्यांचे पगार…एस टी डेपो मध्ये जाऊन काही लोकांना पर्सनली भेटून गाड्या ढाब्यावर थांबण्याची विनंती करायची ही कामं ढाबेवाल्याच्या लहान भावाला करावी लागायची म्हणजे खरा पडद्यामागचा हिरो तोच तर होता आणि म्हणून त्यालाच ढाब्याचा प्रमुख समजायचे
यामध्ये सगळ्यात जास्त वट म्हणजे अबू बखरचा कारण त्याच्या हाताची चव आणि त्याचा ढाब्यावरचा वावर तेवढाच महत्त्वाचा ठरायचा आलेल्या मालातून किमान 35 प्रकारचे पदार्थ बनविणे संपूर्ण भटारखाना एकट्याने सांभाळणे कोंबड्या मारणे अन आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या जिभेला संतुष्ट करणे ढाब्यावर सतत हास्याची बरसात सुरू ठेवणे ही अबूचं करायचा तो बाहेर बघायचा नाही अजूनही भटार खाण्याच्या दोन बाय दोनच्या काळ्या कुट्ट खिडकीतून आपलं तोंड सतत दाखवायचा माझ्या पाहण्यातला आणि अविस्मरणीय ढाबा बघा आता म्हणजे खाटा तर प्रत्येक हवेवरच्या ढाब्याचा अविभाज्य घटक या खाटाऐवजी इथं गाद्या असलेला मिनी पलंग आणि त्यालाच जोडलेलं टेबल असा थाट ढाब्याचा फील साठी दोन चार खाटाही असायच्या आणि या वेगळ्या आसन व्यवस्थे व्यतिरिक्त ज्यांना ज्या टेबल खुर्चीवर बसून जेवायचं आहे त्यांच्यासाठी तशी सोय असायची
पंजाबी ढाब्याची सारी सजावट पाहायला मिळायची दुसऱ्या टोकाला आहे ते ओपन किचन पठाणी आणि पंजाबी वेशभूषेतले ते बल्लभाचार्य आपल्यासमोरच विविध पदार्थांची निर्मिती करीत असतात त्या किचन समोर जुन्या वस्तूचं छोटे खानी प्रदर्शनच मांडलेलं दिसतं सगळे बंब…थाळ्या…सुरई असं सगळं सुबक पद्धतीनं मांडलेलं दिसतं अगदी चिनी मातीचे कुल्लड…प्लेट्स…आणि काचेची जुनी वेगवेगळ्या आकाराची भांडी पण त्या इवल्याच्या प्रदर्शनात दिसतात विटांच्या छोट्या छोट्या चुली करून त्याच्यावर मोठाला स्वयंपाक करण्यासाठी ठेवलेली मोठाली भांडीही लक्ष वेधून घेतात मेन्यूकार्डातले पंजाबी पदार्थ दिसणार असे वाटते पण प्रत्यक्षात प्रसिद्ध भल्ले… टिक्की…गोलगप्पे… समोसे…कचोरी… पराठे…अशी चमचमीत पदार्थांची जणू मेजवानी असायची
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here