माढासोलापूर जिल्हा

अशोक लुणावत यांचा नागरी बँक्स असोसिएशनच्या चेअरमनपदी निवडीबद्दल सत्कार तोफांची सलामी देत माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने केले स्वागत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अशोक लुणावत यांचा नागरी बँक्स असोसिएशनच्या चेअरमनपदी निवडीबद्दल सत्कार

तोफांची सलामी देत माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने केले स्वागत

माढा प्रतिनिधीमाढा येथील माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक दगडूलाल लुणावत यांची सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या चेअरमनपदी शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा माढेश्वरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे व संचालक गणेश काशीद यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर प्रथमच नूतन चेअरमन अशोक लुणावत हे माढेश्वरी बँकेत आल्यावर बँकेच्या वतीने फटाके फोडून तोफांची सलामी देत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक बँकेचे सभासद आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन अशोक लुणावत म्हणाले की,माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी माझा ठराव जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पाठवला होता त्यामुळे मला निवडणूक लढविता आली.सर्व नूतन संचालकांनी मला चेअरमनपदाची संधी दिली आहे त्यामुळे माझी बँकींग क्षेत्रातील कामकाज काटकसरीने व पारदर्शक पद्धतीने करून सभासदांच्या विश्वासास पात्र राहण्याची जबाबदारी वाढली आहे.

हेही वाचा – माढा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करमाळा – माढा मतदारसंघातील ‘या’ ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी 38 कोटी 65 लाख निधीची तरतूद; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

यावेळी सरपंच अशोक शिंदे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, व्यवस्थापक नंदकुमार दुड्डम , वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, शाखाधिकारी अमोल मारकड,विक्रम पाटील, शिवाजी घाडगे, विजय मुळे
यांच्यासह बँकेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते

फोटो ओळी- जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अशोक लुणावत. यांचा सत्कार करताना बँकेचे संचालक गणेश काशीद मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे व इतर मान्यवर.

litsbros

Comment here