आरोग्यमाढामाढासोलापूर जिल्हा

माढा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ

माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

माढा / प्रतिनिधी
जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिणी पारेख यांनी आजतागायत विविध ठिकाणी लाखों नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा नव्याने जग पाहण्यासाठी दृष्टी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे माढा मतदारसंघासह राज्यातील अनेक नेत्र रुग्णांना त्यांच्याच हस्ते शस्त्रक्रिया व्हावी अशी तीव्र इच्छा असते असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.

ते माढा येथे माढेश्वरी बँक सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शीचे डॉ.बी.वाय यादव होते.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की, हे नेत्र शिबिराचे 14 वे वर्ष असून बँकेच्या माध्यमातून नेत्र रुग्णांची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पारदर्शक आर्थिक व्यवहारांबरोबरच हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवित आहोत.बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली नेत्रदिपक प्रगती झाली असून सातत्याने नफा वाढला आहे.

यावेळी बोलताना नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने म्हणाले की,आ. बबनदादांना नेहमी वाटते की, जनतेच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी सातत्याने नेत्र शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून गरजू व गोरगरिबांची सेवा केली पाहिजे.जर दीर्घायुष्यी व्हायचे असेल तर कोणतेही वाईट व्यसन करू नका, कोणताही आजार कधीच लपवू नका असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांनी रुग्णांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,माढा मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.माढा शहरात ग्रामीण रुग्णालयात ऑपरेशन थिएटर सुरू केले आहे तेथे वर्षभर शस्त्रक्रिया सुरू असतात.ते आणखी अद्ययावत करण्यासाठी 25 लाखांचा निधी दिला आहे.कुर्डूवाडी व टेंभुर्णी येथील रुग्णालयात विविध सुविधा निर्माण केल्या आहेत.माढा शहरात डी व बी फार्मसी आणि टेंभुर्णी येथे डी फार्मसी कॉलेज सुरू केले आहे.शिबिराकरिता सन्मती नर्सिंग होमचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.रागिणी पारेख,आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे,नगराध्यक्षा ॲड. मीनलताई साठे,कृषीभूषण सुनंदाताई शिंदे,तहसीलदार राजेश चव्हाण, मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील,पोपट गायकवाड, हनुमंत पाडूळे,डॉ.निशिगंधा माळी,गणेश काशीद,राजेंद्र पाटील,दिगंबर माळी, अमित पाटील,अरविंद नाईकवाडे, शिवाजी पाटील,आप्पासाहेब उबाळे,परमेश्वर देशमुख,डॉ.सुनंदा रणदिवे,डॉ.शिवाजी थोरात,डॉ.गणेश इंदुलकर,सपोनी शाम बुवा,झुंजार भांगे,डॉ.नंदकुमार घोळवे,डॉ.अशोक मेहता,डॉ. शेळके,डॉ.मल्लिनाथ मलंग,बारामतीचे मिलिंद संगई,अमर महाडिक,कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे,संभाजी थिटे,दत्तात्रय मुळे, नंदकुमार दुड्डम,मधूकर पाटील, अजितसिंह देशमुख,धनंजय शहाणे,

हेही वाचा – आमदार बबनदादा शिंदे यांची माढेश्वरी बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

विठ्ठलवाडी येथील आनंद बाजाराला ग्रामस्थ व महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद बाजारात झाली सुमारे 22 हजारांची आर्थिक उलाढाल

आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,विवेक गव्हाणे,नगरसेवक राजू गोटे,प्रताप साठे,सरपंच अशोक शिंदे,संतोष लोंढे,कुमार शिंदे,शिवाजी बारबोले, रमाकांत कुलकर्णी,जाफर पटेल, शहाजी चवरे,दत्तात्रय अंबुरे, बाळासाहेब चव्हाण,प्रदिप चौगुले, सचिन चवरे,उत्तम रणदिवे,अमोल चवरे,निलेश कुलकर्णी,राजकुमार भोळे,अमोल मारकड,अनिल वीर, राजकुमार पवार,अनिल कदम यांच्यासह आरोग्य विभाग,माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन डी.व्ही.चवरे यांनी केले, आभार बँकेचे संचालक प्रा.गोरख देशमुख यांनी मानले.

फोटो ओळी – माढा येथील नेत्र शिबिराच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना आ.बबनराव शिंदे बाजूला डॉ्,तात्याराव लहाने,डॉ.रागिणी पारेख,आ.संजयमामा शिंदे,डॉ.बी.वाय यादव,चेअरमन रणजितसिंह शिंदे, उपाध्यक्ष अशोक लुणावत व इतर मान्यवर.

litsbros

Comment here