हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त राजुरी येथे विद्यार्थ्यांना मोफत सराव प्रश्नसंचाचें वाटप
केत्तूर (अभय माने) राजुरी येथे हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित कै.सर्जेराव नामदेवराव साखरे पाटील यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, संदिप गलांडे यांच्या विशेष सहकार्यातून श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत सराव प्रश्नपत्रिका संच देण्यात आले.
अजय साखरे आणि करमाळा युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी अजय साखरे यांनी विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रगतीशील बागायतदार वसंत लालासाहेब भोईटे यांच्या हस्ते सराव प्रश्नसंचाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुखदेव साखरे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक झोळ सर व इतर स्टाफ ज्येष्ठ शिवसैनिक अर्जुन (आबा) साखरे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे, हानुमंत निकत,विठ्ठल देशमुख, विकास देशमुख,उमेश साखरे रावसाहेब जाधव,संदिपान साखरे उपस्थित होते.
कार्यक्रमाला राजुरी आणि परिसरातील विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. राजुरी येथील श्री वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे श्री राजेश्वर विद्यालय याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सूत्रसंचालन धनंजय साखरे सर यांनी केले. व आभार अजय साखरे यांनी मानले.
Comment here