करमाळा

करमाळा येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बदरोद्दीन बागवान यांचे मुस्लिमांचे पवित्र तिर्थक्षेत्र मक्का मदिना येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बदरोद्दीन बागवान यांचे मुस्लिमांचे पवित्र तिर्थक्षेत्र मक्का मदिना येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहरातील एसटी स्टँड जवळील कुरेशी मोहल्ला येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बुजरूद्दीन हाशम बागवान वय 65 यांचे आज पहाटे मुस्लिमांचे पवित्र तीर्थक्षेत्र काबा ये मक्का मदिना येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ते नुकतीच काही दिवसापूर्वी करमाळा येथून काही मुस्लिम तीर्थयात्रेकरू बरोबर हाज यात्रेसाठी गेले होते तेथे हाच यात्रा पूर्ण केल्यानंतर त्यांना तेथील निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले.

मुस्लिमांची पवित्र तीर्थक्षेत्र मक्का मदीना या ठिकाणी बागवान यांना मरण आल्याने ते मरण मुस्लिम समाजामध्ये पवित्र असे समजले जातात त्यांच्यावर मक्का मदीना या ठिकाणी लाखो तीर्थ करूच्या उपस्थित त्यांच्यावर मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला.

बागवान हे मन मिळावु शांत स्वभावाचे होते त्यांच्या निधनाने बागवान समाजामध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांना करमाळा येथील सर्व मशिदी मधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या पाश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे व पणतु असा मोठा परिवार आहे.

litsbros

Comment here