करमाळाशेती - व्यापार

लिंबाला मागणी वाढली;दरही वाढले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लिंबाला मागणी वाढली दरही वाढले

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यात व परिसरात उष्णतेचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा कडाका सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात थंड पेय बनवण्यासाठी घरोघरी लिंबाची मागणी वाढली आहे तर आवक कमी असल्याने लिंबाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात 80 रुपये किलोंनी मिळणारे लिंबू आता मात्र 110 ते 120 रुपये किलो या दराने विकत घ्यावे लागत आहेत.एक लिंबू मात्र 5 ते 7 रुपयांना विकत घ्यावे लागत आहे.

यावर्षी राज्यात पाऊस काळ कमी झाल्याने लिंबाचे फळ गळून पडत आहे तर लिंबाच्या बागाही कमी झाल्या आहेत.त्यातूनही ज्या ठिकाणी लिबाच्या बागा आहेत, त्यावर वारंवार बदलते वातावरणामुळे फळ कमी लागली आहे.मागणी वाढली आहे.गुढीपाडवा झाल्यानंतर ग्रामीण भागातील ग्रामदेवतांच्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू होणार आहे.वाढणाऱ्या उष्णतेमुळे बाहेरगावातून आलेले नागरिक व पै पाहुण घरी येताच त्यांना लिबु पाणी देत आहेत तर यात्रेत गेल्यानंतर असह्य उष्णतेमुळे व्याकुळ झालेल्या नागरिक शरीराला गारवा मिळावा म्हणून नजीकच्या उसाच्या रसवंती गृहाकडे अनेक नागरिकांची पावले आपोआप वळत आहेत.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

व्यवहारात दहा रुपयांच्या नोटा गायब तर नाण्यांचा खळखळाट!

रसवंती गृहाला लिंबाची मागणी वाढली आहे.वाढत्या उन्हामुळे दुपारच्या दरम्यान नागरीक बाहेर जाण्यापेक्षा घरी थांबणेच पसंत करीत आहेत त्यामुळे घरोघरी लिंबू शरबत ही केले जात आहे. यामुळे लिंबाला आणखी मागणी वाढेल्यास बाजरभावही आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

litsbros