..आता मोबाईल वापरणेही झाले महाग!
केतूर (अभय माने) : सध्या महागाईची झळ सर्वच क्षेत्राला जाणवत आहे व ही महागाई सर्वसामान्यांना असहप होत आहे. सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात मोबाईलने महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.
या मोबाईल रिचार्ज दरात आता भरमसाठ वाढ झाल्याने मोबाईलवर बोलणेही महाग पडत आहे.यामध्ये भरीस भर शालेय विद्यार्थ्यांना आता आवश्यक मोबाईल झाला आहे त्यामुळे सुरुवातीला मोफत सेवा देऊन ग्राहकांना सवय लावणाऱ्या मोबाईल कंपनी सध्या मात्र मोबाईल म्हणजे “भीक नको पण कुत्रे आवर” अशी अवस्था केली आहे.
सध्या एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, जिओ आदि कंपन्यानी रिचार्ज दरात जवळपास 20 टक्क्यांनी झाली आहे ही दरवाढ एक डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे.
रिचार्जच्या दरात अचानकपणे भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट मात्र स्कूल कोलमडले आहे. खासगी दूरसंचार कंपन्यावर सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
Comment here