करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार; करमाळयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल; पवार कुटुंबावरील ही नाव न घेता केली जहरी टीका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार; करमाळयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल; पवार कुटुंबावरील ही नाव न घेता केली जहरी टीका

करमाळा (प्रतिनिधी);
माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे सांगत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे कारभार करून महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला
त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याला महाराष्ट्रातील जनता बांधील नाही तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसामान्यात सहभागी व्हावे लागते अशी टीका सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

करमाळा येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल व आदिनाथच्या संचालिका रश्मीताई बागल यांनी केले
यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकासाचा रथ जोरात दवडू लागला आहे .

पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडातील हक्काचे पाणी स्वतःच्या जिल्ह्यासाठी पळवले विशेषता सोलापूर नगर जिल्ह्याचे पाणी पळवले.

तर आपली जनता त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचत होती मात्र आता जनता हुशार झाली असून आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेतकरी जागृत झाला आहे
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश बलवान होत असून देशातील शेतकऱ्यांसाठी जवळपास वीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध केला आहे
महाराष्ट्र शासनाने सुद्धा शेतकरी सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत.

तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याला शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जास्तीत जास्त मदत करू
बोलताना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की जातेगाव ते टेंभुर्णी हा रखडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी कडून हा प्रश्न मार्गी लावावा शिवाय करमाळा शहरातील 384 गेली 40 वर्षापासून रहिवास असलेल्या नागरिकांचा मालमत्ता कार्ड उघडून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.

यावेळी बोलताना रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने बागल कुटुंबीय व मोहिते पाटील कुटुंबात मतभेद झाले होते पण मनभेद झाले नव्हते
आदिनाथ चा निवडणुकीनंतर सर्व निवडणुका एकत्रित लढवायची ठरली होती पण ती वेळ गेली मात्र आता इथून पुढे कशा निवडणुका लढवायच्या आहे हे लवकरच ठरवू असे सांगत नारायण पाटील व बागल गट यांची युती करण्यासाठी मोहिते पाटील पुढाकार घेणार असे स्पष्टपणे संकेत दिले

हेही वाचा – करमाळयासह इतर सहा तालुक्यांमध्ये तब्बल बारा मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरांना करमाळा पोलिसांनी घातल्या बेड्या

जेऊर येथे जिजाऊ-सावित्री पुजना नंतर महिला महोत्सवाला उत्साहात प्रारंभ; विविध स्पर्धांत पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड प्रतिसाद

यावेळी बोलताना दिग्विजय बागल यांनी स्वर्गीय दिगंबर बागल यांची अकाली निधन झाल्यानंतर राजकारणात आम्ही पोरके झाले असून आता इथून पुढे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील व रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आमचे पालकत्व घ्यावे अशी जाहीर व्यासपीठावर हात जोडून विनंती केली. या विनंतीला उपस्थित बागल समर्थकांनी टाळ्याच्या कडक करून करून साथ दिली

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाषणाने बागल गटाचे चैतन्य आले असून व्यासपीठावरील मान्यवरांनी आगामी राजकारणात बागल कुटुंबाला साथ देण्याची ग्वाही दिल्यामुळे गटाचे नेते रश्मी बागल कोलते यांच्या चेहऱ्यावर हसू फुलून आत्मविश्वास वाढल्याचे त्यांच्या हालचाली येऊन दिसत होते.

litsbros

Comment here