करमाळा शहरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये आज रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहामय वातावरणात साजरा करण्यात आला.गेली दोन वर्ष रंगपंचमीच्या सणावर कोरोनाचे गडद सावट असल्यामुळे रंगपंचमी साजरी करता आली नाही.
मात्र यावर्षी रंगपंचमीचा सण अनेक जणांनी वेगवेगळ्या रंगाची उधळण करीत व एकमेकांना रंग लावीत सदरचा रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साह वातावरणात साजरा केला करमाळा शहर तसेच परिसरातील जेऊर चिकलठाण पारेवाडी कंदर केम परिसरात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
रंगपंचमीच्या सणानिमित्त अनेक मित्रांनी आपल्या जवळच्या मित्रांना तसेच मैत्रिणींना वेगवेगळ्या प्रकारचे रंग तसेच सिल्वर यासारखे रंग लावीत मनसोक्तपणे रंगपंचमीचा सण साजरा केला.
यावेळी करमाळा शहरातील वेगवेगळ्या गल्लीमध्ये अनेक तरुण मंडळांनी रंगाचे बॅरल रंग खेळण्यासाठी ठेवले होते यावेळी अनेक तरुणांनी याचा पुरेपूर लाभ घेत एक वेगळ्या प्रकारे रंगपंचमी साजरी केल्याचे दिसून आले.
Comment here