करमाळाकेममहाराष्ट्रशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

सहा महिने उलटून गेले तरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही; तत्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सहा महिने उलटून गेले तरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही; तत्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन

करमाळा (प्रतिनिधी); परतीच्या अवकाळी पावसाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. 6 महिन्यांपूर्वी पंचनामे देखील झाले, मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहे. दिवाळी पूर्वी परतीचा पाऊस झाला होता. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने तालुका स्तरावर दिले होते. पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई जमा झाली नाही.

शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा दिवाळी तोंडावर आली होती. त्यावेळी दिवाळी गोड करू असे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र पंचनामे होऊन 6 महिने उलटली तरी अद्याप रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नाही. कांदा, ज्वारी, बाजरी, मका तसेच इतर फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोडून पडण्याची वेळ आली आहे. नुकसान भरपाई मिळाल्यावर एक आधार मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र प्रतीक्षा करूनही भरपाई मिळत नाही. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रात नुकसान झाले आहे.

तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले होते. झटपट झालेल्या पंचनाम्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा होती. नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता संघटना देखील रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी बळीराजा करत आहे.

सहा महिन्यांपूर्वी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी शासकीय अधिकारी करून गेले होते. तात्काळ मदत मिळेल असे शासन स्तरावरून सांगितले जात होते. मात्र ६ महिने होऊन देखील शासनाने नुकसान भरपाई खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट आलं आहे. शासनाने गांभीर्य ओळखून नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी.
– विपुल गोरे (शेतकरी)

सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधीची तरतूद देखील केली आहे. मात्र निधी मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुढील ७ दिवसात जर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.
– संदीप तळेकर (तालुकाप्रमुख प्रहार जनशक्ती संघटना)

litsbros

Comment here