करमाळाजेऊर

जेऊर येथे जिजाऊ-सावित्री पुजना नंतर महिला महोत्सवाला उत्साहात प्रारंभ; विविध स्पर्धांत पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड प्रतिसाद  

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथे जिजाऊ-सावित्री पुजना नंतर महिला महोत्सवाला उत्साहात प्रारंभ; विविध स्पर्धांत पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड प्रतिसाद  

करमाळा(प्रतिनिधी); जेऊर येथे महिला महोत्सवाची जोरदार सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शेकडो महिलांचा सहभाग दिसून आला. मा. आ. नारायण (आबा) पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून महिला महोत्सवास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन महिला नेत्या सौ ज्योतीताई नारायणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी सौ शारदा गादिया, सौ मंगल गादिया, सौ यास्मीन शेख, सौ रोहीणी सुतार, सौ उषाताई सरक, निंभोरे ग्रामपंचायत सरपंच सौ कांबळे वहिनी, मा. पंचायत समिती सदस्या सौ माया तळेकर, सौ डाॅ कानगुडे, सौ जयश्री दळवी, सौ रत्नमाला बादल, श्रीमती विजयाताई कर्णवर, श्रीमती नंदा तळे, सौ नंदा गादिया, सौ श्वेता गादिया, सौ वैशाली पाथ्रूडकर, सौ लकडे मॅडम, सौ बंडगर मॅडम, शिंदे मॅडम आदिसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सुरुवातीला उखाणे स्पर्धा संपन्न झाली. यात तीन राऊंड मध्ये वेगवेगळ्या अक्षरांवर आधारित अनेक सुंदर व स्वयंरचित उखाणे महिलांनी सादर केले.

 यानंतर अनुभव कथन हि स्पर्धा पार पडली यात अनेक महिलांनी त्यांच्या जीवनातील सुख दु:खाच्या प्रसंगाची सुरेख मांडणी करुन पाच मिनीटात भावस्पर्शी प्रसंग उपस्थित महिलांच्या डोळ्यासमोर उभे केले. यानंतर महिलासाठी फनी गेम्स घेण्यात आले. 

यात लिंबू-चमचा, पायाला फुगे बांधून फोडणे, पाटीत बाॅल ठेऊन लंगडी, डोळ्यावर रुमाल बांधून टांगत्या थाळीस अचूक काठी मारणे, पीठ असलेल्या थाळीतून फुंकर मारुन चाॅकलेट शोधणे आदि मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. यात बहुसंख्य महिलांनी भाग घेतला. 

उद्या महिला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रांगोळी, मेहंदी, हस्तकला, संगीत खुर्ची तसेच उर्वरीत फनी गेम घेण्यात येणार आहे. तरी जेऊर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

litsbros

Comment here