माढा सोलापूर जिल्हा

वित्तीय संस्थांनी व्यक्तीची पत व क्षमता पाहून कर्जपुरवठा करावा – चेअरमन रणजितसिंह शिंदे वाकाव येथे श्री संत माणकोजी महाराज पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वित्तीय संस्थांनी व्यक्तीची पत व क्षमता पाहून कर्जपुरवठा करावा – चेअरमन रणजितसिंह शिंदे

वाकाव येथे श्री संत माणकोजी महाराज पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

माढा/ प्रतिनिधी – ग्रामीण भागातील पतसंस्थेसह इतर कोणत्याही प्रकारच्या वित्तीय संस्थांच्या वृद्धीसाठी पारदर्शक कारभार व सभासदांची विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. कर्ज वाटप करताना समोरच्या व्यक्तीची पत व क्षमता पहावी, संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामकाज करावे,कर्जवसुली करताना कसलाही भेदभाव करू नये,संचालक मंडळानेही संस्थेच्या प्रगतीसाठी वेळ द्यावा तसेच झालेल्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,कर्जदारांनी निर्धारित वेळेत कर्जाचे हप्ते भरणे आवश्यक असते तरच कोणतीही वित्तीय संस्था नावारूपाला येवू शकते असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

ते वाकाव ता.माढा येथे श्री संत माणकोजी महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या शुभारंभाच्या वेळी बोलत होते.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे वाकाव नगरीत स्वागत तोफांची सलामी देत केले.

पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की,ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थी,शेतकरी, वयोवृद्ध लोक आणि महिलांना गावातच आर्थिक व्यवहार सहजासहजी करण्याच्या दृष्टीने पतसंस्था सुरू केली आहे.या माध्यमातून अनेकांच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊन मदत होणार आहे परंतु सर्वांनी ही संस्था आपली आहे या भूमिकेतून व्यवहार केले पाहिजेत. वाकाव येथील निष्ठावंत लोकांची वैयक्तिक व सार्वजनिक कामे प्राधान्याने केली जातील.शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासाठी शंभर टक्के सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील,संचालक हनुमंत पाडूळे,पी.टी.काळे,चेअरमन सयाजी भुसारे,ग्रामपंचायत सदस्य माणकोजी भुसारे,भारत खंडागळे, ग्रामसेवक प्रकाश सावंत,व्हा.चेअरमन माणिक भुसारे,नगरसेवक राजू गोटे, प्रगतशील शेतकरी महेश चव्हाण, चेअरमन रमाकांत कुलकर्णी,युवानेते शंभू साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे,प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके,रवींद्र चव्हाण,माणिक नागटिळक,गजेंद्र भुसारे,औदुंबर भुसारे,संतोष खोत,हरिदास भुसारे, चंद्रकांत चव्हाण,अशोक वीर,विष्णू भुसारे,रोहन कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – आ.बबनराव शिंदे यांचेकडून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 1 लाखाची मदत मानेगाव येथील संस्कृती मोटे व दिपक गावडे यांना दिले प्रत्येकी 50 हजार

करमाळा तालुक्यातील एक दोन नव्हे तर ‘या’ नऊ जणांची PSI पदी निवड; अभ्यास करणाऱ्या तरुणाईत उत्साह

प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव अमोल केसरे यांनी केले.सूत्रसंचालन करून आभार प्राथमिक शिक्षक संतोष भुसारे यांनी मानले.

 जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक पतसंस्था चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे बंद पडल्या आहेत परंतु माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आजही स्पर्धेच्या युगात उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.संस्थेचे संस्थापक-चेअरमन अनिलकुमार अनभुले यांच्या कुशल नेतृत्वाखाली मागील 25 वर्षांपासून सभासद व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र राहून कामकाज चालू आहे.गावातील लोकांच्या वित्तीय गरजा व व्यवहार गावातच पूर्ण होतात याचा आदर्श इतर वित्तीय संस्थांनीही घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

फोटो ओळी – वाकाव ता.माढा येथे श्री संत माणकोजी महाराज पतसंस्थेचा शुभारंभाच्या वेळी बोलताना चेअरमन रणजितसिंह शिंदे बाजूला सुहास पाटील,माणकोजी भुसारे,शंभू साठे व इतर मान्यवर.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!