करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

Viral VDO | उजनी धरणात मगर सदृश प्राण्याचे वास्तव्य? मच्छीमार व इतर नागरिकांत घबराट! व्हिडीओच्या खात्रीची गरज

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

Viral VDO | उजनी धरणात मगर सदृश प्राण्याचे वास्तव्य? मच्छीमार व इतर नागरिकांत घबराट! व्हिडीओच्या खात्रीची गरज

केत्तूर (अभय माने) दौंड येथे भीमा नदीपात्रात पुण्यातील धरणातून येत असलेल्या पाण्याबरोबर मगर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे याची पुष्टी होत नसल्यामुळे तसेच अधिकृत माहिती काहीही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी, मच्छीमारांनी तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु सतर्कता घेणे गरजेचे आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी उजनी जलाशयातील भिमानगर येथे मच्छीमार बांधवांनी मगर पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली होती.तर करमाळा तालुक्यातील कंदर येथेही मच्छीमारांनी एक मगर पकडून वन विभागाच्या ताब्यात दिली होती तसेच उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव (ता. इंदापूर) परिसरातही मगरीचे वास्तव्य असल्याचे दिसून आले होते.

यामुळे उजनी धरण परिसरातही मगरी असल्याचे अनेक भक्कम पुरावे याआधीच मिळाले आहेत.त्यामुळे उजनी धरण परिसरात मासेमारी करणारे मच्छिमार व शेतकर्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती.

मात्र गेली दोन वर्षात धरणातील पाणीसाठा निच्यांकी स्तरावर गेलेला असतानाही मगरीचे दर्शन कोणालाच घडले नाही.त्यामुळे उजनी धरणात सध्याच्या घडीला तरी मगरी आहेत का नाही हे अजूनतरी स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – कटला जातीचे दोन मासे देऊन केला मच्छीमार बांधवांनी आमदार भरणे यांचा केला आगळावेगळा सत्कार

वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

मात्र पुणे परिसरातील विविध धरणातून पाणी खाली सोडल्यानंतर दौंड परिसरात मगर दिसल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर्ती प्रसारित होत आहेत. यामुळे भिमानदीत मासेमारी करणारे मच्छिमार व शेतकऱ्यांमधून भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

litsbros