अंजनगाव येथील श्री खिलोबा विद्यालयाचे क्रिडा शिक्षक विनोद काळे यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा कृतिशील क्रिडा शिक्षक म्हणुन पुरस्कार जाहीर
माढा प्रतिनिधी – अंजनगाव खे ता माढा येथील क्रिडा शिक्षक विनोद सदाशिव काळे यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने कृतिशील क्रिडा शिक्षक म्हणुन पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य कृती समितीचे प्रदेश सचिव मा दत्तात्रय सावंत सर यांनी ही निवड केल्याचे कळवले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सिंहगड कॉलेज कोर्टी ता पंढरपुर येथे दुपारी 1 वाजता समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.विनोद काळे हे गेली 24 वर्षापासुन अंजनगाव खे येथील खेलोबा विद्यालयात क्रिडा शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. याचबरोबर इंग्रजी विषयाचेही ते अध्यापनाचे काम करीत आहेत. माढा तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या स्पर्धेसाठी ते पंच म्हणुन काम करतात. राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी त्यांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे.
हेही वाचा – दिपक ओहोळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत यश
विनोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक खेळाडूनी कबड्डी ,खो-खो, बॉक्सिंग आणि वैयक्तिक खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे. विविध खेळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मिलिटरी आणि पोलीस मध्ये सेवा करत आहेत.क्रिडा क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना या अगोदर रोटरी क्लब ऑफ़ माढा च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थापक सुभाष नागटिळक यांच्यासह मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.