करमाळाधार्मिक

गुढीपाडव्याचे लागले वेध; साखरगाठी तयार करण्याची लगबग सुरू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गुढीपाडव्याचे लागले वेध; साखरगाठी तयार करण्याची लगबग सुरू

केम (प्रतिनिधी-संजय जाधव); होळी सणानंतर खऱ्या अर्थाने वेध लागते ते गुढीपाडवा सणाचे! मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून केली जाते.

केम तालुका करमाळा येथील प्रदिप शिंदे कुटुंब गेले वीस वर्षांपासून हारगाठी तयार करण्याचा व्यवसाय करत आहे. या धंद्यासाठी मनुष्य बळाची गरज लागते. साधरणपणे दहा महिला लागतात. वाढत्या महागाईमुळे या धंद्याला म्हणावे तसे मार्जीन राहिले नाही.

तरी पण आपल्या व्यवसायाची परंपरा टिकविण्यासाठी त्यांचा व्यवसाय सुरू आहे. या धंद्यासाठी साखर महत्त्वाचा घटक आहे एक क्विंटल साखरेपासून साधरण ,९०कि हार तयार होतात दिवसाला ३०० ते ४०० किलो हार होतात.

हाराला केम परिसरातून चांगली मागणी आहे. संत सावता माळी महिला बचत गटातील महिला हार तयार करण्याचे काम करतात. साधरण एका महिलेला ३५० रू हाजरी आहे या मधुन दहा महिलांना रोजगार उपलब्ध होतो.

सध्या केम येथे दुर्गळे कुटुंब व आम्ही या व्यवसायाची पंरपरा टिकून ठेवली आहे अशी माहिती प्रदिप शिंदे यांनी करमाळा माढा न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिली.

litsbros

Comment here