करमाळा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आवाटी सबस्टेशन चा भूमिपूजन समारंभ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आवाटी सबस्टेशन चा भूमिपूजन समारंभ

करमाळा (प्रतिनिधी);
सातत्याने 3 वर्ष कोळगाव धरण 100% भरल्यामुळे कोळगाव धरण आणि परिसरामध्ये विजेची गंभीर समस्या निर्माण झालेली होती.

या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी आवाटी येथे नवीन सब स्टेशन मंजूर करून आणले असून या सबस्टेशनचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक 22 मार्च रोजी आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार जयवंतराव जगताप हे भूषविणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. तात्पुरता विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कोळगाव येथे 3 एम व्ही ए या ट्रांसफार्मर ची दुरुस्ती ही आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेली होती.

आमदार शिंदे यांच्या कार्यकाळात 6 ॲडिशनल ट्रांसफार्मर ची मंजुरी तसेच 3 नवीन सब स्टेशनची उभारणी होणार होणार…

2020 पासून अवघ्या 3 वर्षाच्या कार्य काळामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात आवाटी ,रावगाव व राजुरी ही 3 नवीन सबस्टेशन उभा राहत असून 9 ॲडिशनल ट्रांसफार्मर ची मंजुरी मिळालेली आहे.

यामध्ये कात्रज येथील ॲडिशनल ट्रांसफार्मर सुरूही झालेला आहे. त्याचप्रमाणे पांडे ,कोर्टी या ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर ची कामे सुरू असून कविटगाव, दहिवली , कव्हे, कुर्डू ,पिंपळनेर व म्हैसगाव येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरची कामे मंजूर आहेत.

litsbros

Comment here