*उजनी फुल्ल 107 %*
*आनंदाची डोही…..*
केत्तूर ( अभय माने) सोलापूर जिल्ह्यात दमदार, मुसळधार पाऊस अद्याप पर्यंत झाला नसता नाही तरीही सोलापूर, पुणे, तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे उजनी धरण हे नेह मीप्रमाणे पुणे जिल्हा परिसर व घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाच्या बळावर ऐन उन्हाळ्यात निचांकी पातळीवर (वजा 60 टक्के) गेला होता तो सध्या अधिक 100 टक्केच्या वर गेला आहे म्हणजेच जवळजवळ 160 टक्के दारणामध्ये पाणीसाठा झाला आहे त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उजनी जलाशयाची पाणी पातळी इतक्या झपाट्याने वाढेल असे कोणासही वाटत नव्हते परंतु, हे सत्यात उतरल्याने जलाशयाने शंभरी पार केली आहे त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. उन्हाळ्यात पिके जगण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती विजेचे खांब जलाशय लांबपर्यंत वाढविण्यात आले होते ते आता पाणी वाढल्याने पाण्यात गेले आहेत त्यामध्ये अजूनही वीजप्रवाह सुरू असल्याने शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांना धोका होऊ शकतो तसेच पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांनी केलेली उन्हाळी भुईमूग, मका तसेच इतर चार पिके पाण्याखाली बुडाली आहेत.
उजनी जलाशयात कोट्यावधी मत्स्यबीज यापूर्वी सोडण्यात आले होते आणखीही कोट्यावधी मत्स्यबीज सोडण्यात येणार असल्याने मच्छीमारांना बांधवांना सुगीचे दिवस येणार आहेत.
दरम्यान भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने दौंड – सिद्धटेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे तर भिगवण – दौंड रस्त्यावरील मलठण जवळील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ताही बंद करण्यात आला आहे.
उजनी जलाशयाचा पाणीसाठा किती वाढला तरी, करमाळा तालुक्यातील गावांना याचा धोका पोहचू शकत नाही कारण, पुनर्वसनानतंर तालुक्यातील गावे जलाशयापासून सुरक्षित अंतरावर वसवली गेली आहेत.