आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,, वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,,
वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

जेऊर प्रतिनिधी
‌जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात विज बिल थकीतेमुळे लाईट कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्वरित लाईट कनेक्शन न जोडल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. जेऊर शहर अध्यक्ष अतुल निर्मळ यांचा इशारा जेऊर ग्रामीण रुग्णालयात अंदाधुंद कारभार चालू आहे.

प्रशासनाने दखल घेऊन त्वरित लाईट बिल भरावे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री मा.ना. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील असून गावापासल्या जवळील तालुक्यात अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात आरोग्य विभागाची काय परिस्थिती असेल. तसेच जेऊर येथे त्यांचा शासकीय दौरा होऊन जातात जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयाची लाईट गुल जेऊर हे करमाळा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून ग्रामीण भागातील लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात असून जर रात्रीच्या वेळेस उपचार होऊ शकत नाही. 

हेही वाचा – श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये एस.एस.सी बॅच सन १९९३-९४ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

दिवसा लाईट नसल्यामुळे औषधांचा साठा खराब होऊन गेला असेल. तसेच वीज बिलाची रक्कम 585400 रुपये असून तरी ते त्वरित भरण्यात यावे तसेच त्वरित लाईट न चालू झाल्यास मा.ना. तानाजी सावंत यांचा संभाजी ब्रिगेड करमाळा तालुक्यात कोठेही कार्यक्रम होऊ देणार नाही.

litsbros