करमाळामाढासोलापूर जिल्हा

उजनीच्या पाण्याला प्रदूषणाचा विळखा; माशांसह इतर जलचर व प्राणिमात्रांचे आरोग्य धोक्यात, अभ्यासक म्हणतात..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीच्या पाण्याला प्रदूषणाचा विळखा; माशांसह इतर जलचर व प्राणिमात्रांचे आरोग्य धोक्यात, अभ्यासक म्हणतात..

केत्तूर (अभय माने ) सोलापूरसह पुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायनी असणाऱ्या उजनी धरणातील वाढते पाणी प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. आज मानवासह पशुपक्षी प्राणी व सर्वच जलचर, उभयचर प्राणी या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून जीवन मरणाचा संघर्ष करीत आहेत. त्यापैकी अनेक मासळीच्या जाती नष्ट झाल्या आहेत.तर बहुतांश माशाच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे उजनी धरणातील पाणी शाप की वरदान बनले आहे, हेच समजेनासे झाले आहे.

राज्यातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे आगार व सर्वात मोठा म्हणजे 63 टीएमसी मृतसाठा असणारे म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जात होते.मात्र बदलत्या धोरणानुसार राजकारण्यांनी विकासाच्या नावाखाली गेली 30 – 40 वर्षाच्या काळात धरणालगतच्या परिसरात अनेक साखर कारखाने,केमिकलयुक्त कॅम्पन्या छोटे मोठे उद्योग कारखाने उजनी धरणातील पाण्याच्या आधारावरती आणून बसवले आहेत. मात्र या कारखान्यांनी उजनीतून स्वच्छ काचेप्रमाणे दिसणारे पाणी उचलले व धरणात घाण व केमिकलयुक्त पाणी सोडले.

त्याचबरोबर पुणे, पिपरी चिंचवड कुरकुंभ एमआयडीसी आदी ठिकाणांसह पुणे व पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरातील नागरिकांची हजारो लाखो टन विष्ठा प्रतिवर्षी धरणात येऊन साठत,त्याचबरोबर घरातील व ईतर ठिकाणचा सांडपाणी ,घाण कचरा व ईतर राडारोडा आजही प्रत्येकजण नदीतच आणून टाकत आहेत. यामुळे नेहमीच सर्वांना स्वच्छ पाणी देणारी उजनी माय आता या रोजच्या मानवाच्या प्रदूषणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.

उजनी प्रदूषित झालेली आहे हे माहिती असतानाही संपुर्ण सोलापूर जिल्हा हेच उजनीतील प्रदूषित पाणी पीत आहे.दरवर्षी आषाढी वारीला राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरला विठु माऊलीच्या भेटीला व दर्शनासाठी जात असतात.

त्यावेळी तेथिल सर्वच भाविक भक्तजन याच उजनीतील प्रदूषित पाण्यात तोड धुणे, स्नान करण्यासह पिण्यासाठी हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता वापरतात .यामुळे बहुतांश नागरिक विविध प्रकारच्या आजाराणे त्रस्त होत आहेत.

तसेच दर वर्षी पाऊस झाल्यानंतर उजनी धरणात येणारे पुणे जिल्हा व परिसरातून उजनीत दाखल होणारे पाणी प्रदूषित आणि फेसाळलेले असते.

धरण भरल्यावर दिवाळीनंतर पाण्यावर गडद पोपटी रंगाचा साईटा चढतो व पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त वास मारत असते यामुळे बाहेर धरण अतिशय सुन्दर वाटत असले तरी प्रत्यशात पाण्याकडे पाहिल्यास पाण्यात उतरण्याचे कोणीही धाडस करणार नाही अशी परिस्थिती असते.आता धरणाचा साठा मायनसमध्ये गेला आहे त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मात्र वरचेवर वाढत आहे.

” सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी म्हणून नावारूपाला आलेली उजनी धरण आत शाप ठरत आहे. दिवसेंदिवस बिघडत चाललेली पाण्याची दर्जा बाबतीत अनेकवेळा संशोधकानी लक्षात आणून देऊन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही.जलाशयातील पाणी पूर्ण प्रदूषित झाल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. या बाबींकडे लक्ष नाही दिले तर भविष्यात प्रदूषित पाणी मानवी समाजाबरोबर पाळीव प्राण्यांना मारक ठरेल.‌
– डॉ.अरविंद कुंभार,पक्षी अभ्यासक व निरीक्षक

” वरचेवर उजनीच्या पाण्याला मागणी वाढत असताना या पाण्याचे प्रदूषण वाढवणारे प्रदूषण कमी कसे करता येईल याकडे मात्र कोणीही पाहत नाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.हेच मोठे दुर्दैवाचे आहे आणि आगामी काळात हे त्रासदायक ठरणार आहे.उजनी च्या पाणी प्रदुषणाबाबत जनहीत याचिका दाखल करणार आहे.
– अँड.अजित विघ्ने,सामाजिक कार्यकर्ते, केत्तूर

” जलजीवन मिशनसारख्या पाणी पुरवठा योजना अस्तित्वात येत आहेत यासाठी कोट्यावधी रुपयांचे इस्टीमेट मंजुर झाली आहेत परंतु त्यामधे पाण्याचे फिल्टरेशन बाबत तरतुदी नाहीत याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असुन फिल्टरेशनशिवाय योजनाच मंजुर केली नाही पाहीजे.
-भास्करराव भांगे,कंदर,सरपंच

हेही वाचा – हिंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव जाधव बिनविरोध, तर संचालक पदी..

******** उजनीकाठचा भाजीपाला ********

गाळ काढणे महत्वाचे

” उजनी धरणातील प्रदूषण हे धरणातील पाणीसाठा मृतसाठयात गेल्यानंतर जास्त प्रमाणात दिसून येते.इतर धरणाप्रमाणेच उजनी धरणातील मूतसाठा पाणी काढण्याची सोय नाही.मृतसाठा म्हणजे निर्जीव साठा असून यामध्ये गाळाचे प्रमाण जास्त आहे व दरवर्षी या गावांमध्ये वाढच होत आहे.

वाहते पाणी असल्यास प्रदूषण असले तरी ते जाणवत नाही परंतु पाणी कमी झाल्यानंतर प्रदूषण मोठ्या प्रमाणावर जाणवते या घाण पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने ते जलचरांना विशेषता माशांना ऑक्सिजन मिळत नाही व धरणातील माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याने फक्त घाण पाण्यात वाढणारा चिलापी जातीचा सर्रासपणे सापडतो व इतर जातीचे मासे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे मात्र नामशेष होत आहेत.

उजनी धरण पाणीसाठ्यात पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील 20 ते 22 धरणातील गाळ व मैला मिश्रीत पाणी उजनीतच दाखल होते. प्रदूषण मुक्तीसाठी मृत साठ्यातील गाळ काढणे हाच पर्याय असून शासनाच्या देखरेखीखाली हे काम करणे गरजेचे आहे यासाठी शासनाने कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे तरच प्रदूषणाला आळा बसू शकतो.

– श्रीनिवास वडगबाळकर,प्राचार्य (माजी) दयानंद कॉलेज
भूजल तज्ञ

litsbros

Comment here