हिंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव जाधव बिनविरोध, तर संचालक पदी..
केत्तूर ( अभय माने) हिंगणी (ता. करमाळा) येथील हिंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव निवृत्ती जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व १३ संचालकांच्या उपस्थिती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यु एस बेंडारी यांनी जाधव यांची निवड जाहीर केली.
यावेळी सचिव अनिल सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. नुकतीच सोसायटीच्या पंचवार्षिक 2020 ते 28 पार पडली होती व या निवडणुकीत बबनराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली तेरा संचालक निवडले गेले होते.
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी माजी सरपंच हनुमंत पाटील, रामचंद्र जाधव, शंकर जाधव, राजेंद्र बाबर, तानाजी बाबर, सचिन मेजर, किसन बाबर, भास्कर गवळी, विष्णुपंत जाधव, भास्कर जाधव, नवनाथ जगताप यांनी प्रयत्न केले.
हेही वाचा – दुर्दैवी! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार, केळीच्या बागा उद्ध्वस्त; कोट्यवधींचे नुकसान शेतकरी हवालदिल
अध्यक्ष निवडीचेवेळी नूतन संचालक मधुकर जाधव, नितीन जाधव, संदीप बाबर, विष्णू जाधव, बाळासाहेब बाबर, बिभीषण तावरे, दत्तात्रय तावरे, सोमनाथ गुरव,पोपट दडस, दिनकर गायकवाड, विजय जगताप,जयश्री जाधव, संध्या बाबर आदी संचालकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी नूतन अध्यक्ष बबनराव जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Comment here