करमाळा शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

करमाळ्यात तुरीचा तोरा; साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडला ! आज मिळाला ‘इतका’ उच्चांकी दर !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यात तुरीचा तोरा; साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडला ! आज मिळाला ‘इतका’ उच्चांकी दर !

करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीमधे प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच असून शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत १०५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे .

शासन निर्धारीत हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतकऱ्यांनी आपला तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे . सध्या तुरीची दररोज सर्वसाधारण पणे पाचशे कट्टे च्या घरात आवक होत असून दर वाढतच आहेत . तुरीला सरासरी दहाहजार व कमाल साडे दहा हजारांहून अधिक दर मिळत आहे .

तुरीसोबतच ज्वारी , हरभरा व मकेची देखील आवक आता वाढत आहे . तुरीच्या सरासरी उत्पादनात झालेली घट , तुरीची मागणी यामुळे दरात वाढ झालेली दिसत आहे . करमाळा बाजार समितीमधे सध्या दररोज पन्नास लाखाची उलाढाल होत आहे .

हेही वाचा – अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

श्रीराम प्रतिष्ठान करमाळा आयोजित भव्य-दिव्य सामुदायिक विवाह सोहळा ४ फेब्रुवारीला,नागरिकांनी मोठ्या संख्येने शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे : गणेश चिवटे

दुष्काळी परिस्थितीमुळे ओस पडलेल्या करमाळा बाजार पेठेवर याचा काही अंशी का होईना सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती माजी आ. जगताप यांनी दिली .

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!