महाराष्ट्र सांस्कृतिक

नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात तरुणवर्ग व्यस्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात तरुणवर्ग व्यस्त

केत्तूर (अभय माने) सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे 2/3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत .यासाठी 31 डिसेंबर थर्टी फर्स्टचे नियोजन करण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही तरुणाईची उल्हास आणि उत्साह चेहऱ्यावर दिसून येत आहे. प्रत्येकाच्या व्हाट्सअप ग्रुपवर 31 डिसेंबरचे नियोजन कसे ? कोठे ? करायचे याबाबत विचारणा करून बेठकांचे नियोजन होत आहेत. सध्याच्या आधुनिक काळात थर्टी फर्स्ट म्हणजे एक सण म्हणूनच साजरा केला जात आहे.ही खेदाची बाब आहे.

वर्षाच्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात तसेच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थर्टी फर्स्टची चाहूल लागते. या उत्सवाला विधायक स्वरूप देणे गरजेचे झाले आहे.31 डिसेंबर म्हणजे तरुणाची हुल्लडबाजी, दारूचा महापूर ,मांसाहारी बेत हे फॅड वरचेवर वाढत आहे तसेच डीजेच्या तालावर बेभाम डान्स यावर्षी तरी पोलीस प्रशासनाने डीजेवर बंदी घालावी अशी मागणी सद्या सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे.मोजमजेसाठी निमित्त शोधणाऱ्या तरुणायला थर्टी फर्स्ट हे एक निमित्त सापडत सापडले आहे.हे मात्र खरे !

हेही वाचा – पद्मश्री आनंद कुमार यांनी केला प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव

जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान

नववर्षाला देवदर्शनाबरोबरच उजनी पर्यटनासारखे बेत आखले जात आहेत निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत ही एक आगळीवेगळी बाब ठरत आहे.

काही ठिकाणी तरुणाईकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रमही राबविले जाणार आहेत अशी चर्चा आहे परंतु ही चर्चा चर्चेत राहते प्रत्यक्षात काहीच होत नाही हे दिसून आले आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!