करमाळासोलापूर जिल्हा

दुःखद – उजनीवर मोटार ओढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुःखद – उजनीवर मोटार ओढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात रामवाडी (ता.करमाळा) येथील युवक ऋषिकेश बाळासाहेब वारगड (वय 17) हा आज सकाळी बुधवार (ता. 29) रोजी उजनी जलाशयातून आपली विद्युत मोटार ओढण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज आल्याने तोपाण्यात बुडून मृत्यू पडल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश हा नुकताच 75 टक्के गुण मिळवून बारावी पास झाला होता.इंदापूर येथे तो शिक्षण घेत होता.

    याबाबत हकीगत अशी की, पुणे व परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने भीमा नदीला पाणी आले आहे म्हणून मकाई कारखान्याचे जॅकवेल जवळील आपली मोटर पाण्यातून बाहेर ओढण्यासाठी तो सकाळी नऊ वाजता उजनी जलाशयाजवळ तो गेला होता. 

हेही वाचा – पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

मोटार ओढत असताना पाण्याचा प्रवाह आला व तो पाण्यात बुडाला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत वेळ गेली होती.उपस्थित शेतकऱ्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले व भिगवन येथील खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित करण्यात केले.

   ऋषिकेश यांच्या पश्चात आई, एक लहान भाऊ असा परिवार असून या अकस्मात मृत्यूमुळे रामवाडी व परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

litsbros