करमाळासोलापूर

आचारसंहिता सुरू झाली अन चौक, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आचारसंहिता सुरू झाली अन चौक, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

केत्तूर ( अभय माने) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या अनुषंगाने करमाळा शहरासह ग्रामीण भागातही उभारलेले डिजिटल फलक हटविल्याने रस्त्याच्या कडांनी तसेच चौकाचौकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.

हेही वाचा – मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही; दिवेगव्हाण येथे मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार!

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पक्षी संवर्धनासाठी जलपात्र व धान्यपात्राची केली सोय

डिजिटल फलकाद्वारे आव्हान प्रति आव्हान देण्यासाठी कार्यकर्त्याकडून डिजिटल फलक लावले जातात.

यामध्ये वाढदिवस वेगवेगळ्या निवडीचाही समावेश असतो. चौका चौकात या डिजिटल फलकामुळे विद्रूपीकरण केले जाते. परंतु लोकसभेचे आचारसंहिता लागू झाली आणि सर्वच डिजिटल फलक हटविले गेले आहेत.त्यामुळे लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत डिजिटल युद्ध मात्र थांबले आहे.

litsbros