श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उज्वल यश
माढा प्रतिनिधी
कै.सुदाम नारायण साळुंके स्मृती वाचनालय रोपळे खुर्द ता.माढा जि.सोलापूर यांच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पार पडल्या.या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून स्पर्धक आले होते.या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने उज्वल यश संपादन केले.
यामध्ये किशोर गट (इ.9 वी ते इ.12 वी) मध्ये कु.कुलकर्णी समृद्धी संदीप या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले.या यशाबद्दल तिला आयोजकांतर्फे 2000 रु रोख पारितोषिक,ट्रॉफी,प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच खुल्या गटामध्ये कु.फोके संचिता संतोष या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवत उज्वल यश संपादित केले.या यशाबद्दल तिला 1500 रु रोख पारितोषिक,ट्रॉफी,प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय लहान गट (इ.4 थी ते इ.8 वी) मध्ये कु. मोरे मानसी महेश या विद्यार्थिनीने चौथा क्रमांक (उत्तेजनार्थ) पटकावत यश संपादन केले.
काॅफीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाचा आता नवा पॅटर्न;पॅटर्न मुळे काॅफिला बसणार आळा
या यशाबद्दल तिला 500 रु रोख पारितोषिक,ट्रॉफी,प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.या सर्वांना विद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख शब्बीर तांबोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नागेश बोबे सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपळाई बुद्रुक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.