सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवान ठार जिंती येथील घटणा
केत्तूर (अभय माने) पुणे सोलापूर मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता.करमाळा) येथे रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करीत असताना होम सिग्नल (कि.मी 307/42, 320/2) दरम्यान रात्री 9.55 वाजता दिल्लीवरून बेंगलोरकडे जाणाऱ्या के के एक्सप्रेसने जोरदार धडक दिल्याने आर पी एफ जवानाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता.28) रोजी घडली आहे.मृत्यू पावलेल्या जवानाचे नाव श्रीकांत वाघमारे (वय 42) असे आहे.
हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे गड जिंकावेत: प्रा. लावंड
जनसेवा हीच ईश्वर सेवा फाउंडेशन केत्तूर मधील सदस्यांनी मिळवून दिला दोन निराधार महिलांना आसरा
याबाबत माहिती अशी की, श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर वरून भिगवन रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आले होते. ते जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंगसाठी कार्यरत होते. रात्री 9.55 वाजता के. के. एक्सप्रेस सुपरफास्ट जात असताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीने वाघमारे यांना जोरदार धडक दिली व त्यांचा या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.याबाबत पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत. श्रीकांत वाघमारे ही कुर्डूवाडीचे ( ता. माढा) येथील रहिवाशी असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.