श्रेया नवले हिचे यश.
केत्तूर (अभय माने) येथील नेताजी सुभाष विद्यालयची विद्यार्थिनी कुमारी श्रेया प्रवीण नवले (इयत्ता सहावी) हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे दरवर्षी श्री.स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत क्रीडा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यांतर्गत विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा भरवल्या जातात.
हेही वाचा – केत्तूरच्या निकेश खाटमोडे यांची भारतीय पोलीस सेवेत पोलीस उपाधीक्षक म्हणून पदोन्नती
स्पर्धेमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला टॅलेंट सर्च या परीक्षांचा समावेश असतो.सोलापूर, धाराशिव,बीड या तीन जिल्ह्यांचा मराठवाडा विभागामध्ये समावेश आहे. कु. श्रेया नवले हिने मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक मिळवला असून राज्यस्तरावर तिची निवड झाली आहे. तिला मुख्याध्यापक के.एल.जाधव, पर्यवेक्षक बी.जी.बुरुटे एडवोकेट के .पी.धस,व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयात श्रेया नवले हिचा सत्कार करण्यात आला.