*श्रीदत्त जन्मोत्सवास उत्साहात सुरुवात*
केत्तूर (अभय माने) केत्तूर नं.2 (ता.करमाळा) येथे श्री गुरुदत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच गुरुचरित्र पारायण 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होत असून, या सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री गुरुदत्त सेवेकरी मंडळाने दिली आहे.
मुक्ता दरम्यान दररोज हभप एकनाथ महाराज झेंडे (आळंदी),अभंग महाराज निमगाव केतकी (इंदापूर), गणेश महाराज वारिंगे (बीड),मच्छिंद्र महाराज निकम (नेवासा), अर्जुन महाराज पळशीकर, गोपीनाथ महाराज बानगुडे (परांडा),रमेश महाराज शिवापुरकर (सोलापूर) आदींची कीर्तन सेवा सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान होणार आहे.
हेही वाचा – जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांचा आदर्श गाव पाटोदा ला अभ्यास दौरा
कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….
सकाळी काकडा, गाथा, भजन, गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, हरिजागर असे कार्यक्रम आहेत मंडळाचे 38 वे वर्षे आहे. दत्त जयंती निमित्त मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.