माढा शैक्षणिक सोलापूर जिल्हा

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक चे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उज्वल यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक चे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उज्वल यश

माढा प्रतिनिधी – सोलापूर जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने उज्वल यश संपादन केले.विविध मैदानी क्रीडाबाबीत विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

यामध्ये सोरेगाव,सोलापूर येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत 600 मीटर धावणे स्पर्धेत भक्ती निकम हीने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले.तिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तर साक्षी थोरात हीने 200 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.तसेच 400 मीटर व 600 धावणे स्पर्धेत स्वप्नाली देशमुख हीने तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.4*100 मी रिले स्पर्धेत विद्यालयाचा संघ सोलापूर जिल्ह्यात द्वितीय आला. यामध्ये साक्षी थोरात,सानिका थोरात,भक्ती निकम,स्वप्नाली देशमुख व प्रतीक्षा भांगे यांनी उज्वल यश संपादन केले.

17 वर्षे वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत साक्षी काळे हिने 100 मीटर धावणे व 200 मीटर धावणे या दोन्ही क्रीडा स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम करत दुहेरी यश संपादन केले.तिची 100 मीटर धावणे व 200 मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारात पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तर राजनंदिनी वागज हिने 100 मीटर धावणे स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.तिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तसेच 400 मीटर अडथळा स्पर्धेत अपूर्वा शेटे हीने तृतीय क्रमांक मिळविला.

4*100 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलींचा संघ सोलापूर जिल्ह्यात प्रथम आला. यामध्ये साक्षी काळे,काजल पवार,राजनंदिनी वागज,पूजा शितोळे व मैथिली थोरात यांनी उज्वल यश संपादन केले.4*400 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलींचा संघ सोलापूर जिल्ह्यात प्रथम आला.यामध्ये साक्षी गोरे,मैथिली थोरात,अपूर्वा शेटे,काजल पवार व गौरी निकम यांनी उज्वल यश संपादन केले.17 वर्षे मुलींच्या वयोगटातील दोन्ही रिले जिंकून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नवा विक्रम केला.वरील 17 वर्षे मुलींच्या वयोगटामधील दोन्ही रिले संघातील सर्व मुलींची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

हेही वाचा – ब्रहमा चैतन्य विघागिरी आनंदगिरी महाराज यांच्या १८व्या पुण्यतिथी निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले_डॉ.अभय लुणावत

यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री नरेंद्र पवार साहेब, क्रीडा अधिकारी श्री गणेश पवार साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख,स्कूल कमिटी श्री सिताराम गायकवाड,श्री कृष्णा घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे, उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच श्री मनोहर गायकवाड यांच्यासह विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!