श्री किर्तेश्वर देवस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त किर्तन महोत्सव
केत्तूर प्रतिनिधी – केत्तूर येथील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री किर्तेश्वर देवस्थान येथे सालाबादप्रमाणे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट कडून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान किर्तन महोत्सव व फराळ वाटपाचे तर सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान अन्नदाने नियोजन करणेत आले आहे.
ह भ प बळीराम महाराज वायकर, ह भ प परमेश्वर महाराज भिसे, ह भ प अनिरूध्द महाराज निंबाळकर, ह भ प तुकाराम महाराज भारतीबाबा,ह भ प संतोष महाराज वणवे यांचे किर्तन सेवा होणार आहे.गायक म्हणून ह भ प परबत महाराज काळे,ह भ प निळकंठ महाराज काळे यांची सेवा लाभणार असल्याचे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री किर्तेश्वर देवस्थान आध्यात्मिक समितीचे अध्यक्ष ह भ प महेश महाराज येवले यांनी सांगितले.
तर गेल्या श्रावण महिन्यापासून श्री किर्तेश्वर देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान धार्मिक कार्यक्रम होत आहेत.मंदिरास कळस नसल्याने गेल्या वर्षी श्रावण महिन्यात कळसारोहण कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला होता.प्रत्येक सोमवारी अन्नदान,प्रत्येक महीन्यातील मासिक शिवरात्री निमित्त किर्तन अन्नदान,महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह,आषाढी एकादशी निमित्त तिर्थक्षेत्र केत्तूर ते तिर्थक्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळा संपन्न झाला.असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
करमाळा येथे गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजला मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू
देवस्थान कडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची संख्यंत वाढ होत असल्याचे श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री किर्तेश्वर देवस्थान अन्नछत्र समितीचे अध्यक्ष ह भ प धनाजी महाराज पाटील यांनी सांगितले. किर्तेश्वर देवस्थान चा उल्लेख पुरातन धार्मिक ग्रंथ योग वाशिष्ट,काशिखंड,शिवलिलामृत मध्ये आढळुन येत आहे.