शाळेतून पाटी न पेन्सिल गायब
केत्तूर (अभय माने) शाळा म्हणजे नवीन कपडे, दप्तर, दप्तराच्या पिशवीमध्ये दगडी,खापराची पाटी, पेन्सिल आदि साहित्य असे. हाताला धरून अक्षरे दगडी पाठीवरून गिरवायची परंतु, सध्याचे आधुनिक युगात जुन्या दगडी पाटी पेन्सिलची जागा वह्यानी घेतली असल्याचे दिसून येत आहे. वरचेवर काळ बदलला तशी दगडी पाठीची रचनाही बदलत गेली परंतु, ही दगडी, खापराची पाटी सध्या गायब झाली आहे दगडी पाठीची जागा व या पुस्तकांनीच घेतली आहे तरीही काही ठिकाणी मात्र पहिली, दुसरीच्या वर्गासाठी काही शाळांमध्ये मात्र दगडी,खापराच्या पाट्या आता बाजारात मिळत नाहीत. आणि त्याचे ओझेही जास्त असल्याने पालक प्लास्टिक फ्रेमचा पुठ्ठ्याच्या पाट्या खरेदी करण्यावर भर देतात.
” .प्लास्टिकच्या पाट्या फुटत नाहीत त्यामुळे ” शाळा सुटली,पाटी फुटली ” हे गाणे आता इतिहास जमा झाले आहे. विद्यार्थ्यांचे अक्षर लहानपणापासूनच वळणदार यावे यासाठी पाटी आणि पेन्सिल हे आवश्यकच आहे.शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या बोटाला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवतात.वहीवर गिरवता येत नसल्यामुळे इयत्ता पहिली दुसरीसाठी पाटीच आवश्यक आहे.दगडी खापराची पाटी काही शाळांमध्ये कंपल्सरी ठेवली आहे.
बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात व त्याचे साहित्यामध्ये बदल होत गेले परंतु, शाळेचा श्री गणेशा हा दगडी पा पाटीवरच होत असे, दगडी पाटी चुन्याची पेन्सिल यांचे घट्ट व वेगळेच नाते होते.इयत्ता पाचवी सहावी पर्यंत वापरली जाणारी दगडी पाटी सध्यातरी पहिली दुसरी पर्यंतच वापरली जात आहे. या पाटीशी जागा वहिने घेतली असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वीच्या काळी दगडी पाटी त्यावर लाकडी फ्रेम असायची. त्यानंतर त्याची जागा प्लास्टिक तसेच पत्र्याच्या पाट्यांनी घेतली त्या पाटीला रंगीत मण्यांची तार असे असे त्यानंतर हलक्या पुठ्ठ्याच्या पाट्याही प्रचलित झाल्या परंतु, या पाट्याही सध्या शैक्षणिक साहित्याच्या दुकानातून गायब झालेल्या आहेत.वेगवेगळ्या सामाजिक संस्था,तरुण मंडळे हे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देत असतात परंतु त्यामध्येही पाटीचा समावेश नाही हे विशेष.
” खापराच्या पाट्या आता बाजारात मिळत नाहीत.आणि त्याचे ओझेही जास्त असल्याने पालक प्लास्टिक फ्रेमचा पुठ्ठ्याच्या पाट्या खरेदी करण्यावर भर देतात.
प्लास्टिकच्या पाट्या फुटत नाहीत त्यामुळे ” शाळा सुटली , पाटी फुटली .” हे गाणे आता इतिहास जमा झाले आहे.
विद्यार्थ्यांचे अक्षर लहानपणापासूनच वळणदार यावे यासाठी पाटी आणि पेन्सिल हे आवश्यकच आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या बोटाला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवतात. वहीवर गिरवता येत नसल्यामुळे इयत्ता पहिली दुसरी साठी पाटीच आवश्यक आहे.
-विकास काळे, केंद्रप्रमुख,केत्तूर (ता.करमाळा)
” ऑनलाईनच्या जगामध्ये सुंदर हस्ताक्षरासाठी पाटीला पर्याय नाहीच आता काही ठिकाणी पाटीची जागा टॅब ने घेतली आहे.तरी सुध्दा पाटी ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत आवश्यक आहे.राज्य शासनाकडून आता पाठ्यपुस्तकात दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कोरी पाने जोडली गेली आहेत.त्यांचा पण विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
-अर्जुन पिंपरे, शिक्षक, गुलमोहवाडी