पुणे सोलापूर जिल्हा

जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिजाऊ ब्रिगेड च्या पुणे विभागीय अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांची निवड

सोलापूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणित, जिजाऊ ब्रिगेड ची बैठक प्रदेश महासचिव शिवमती स्नेहाताई खेडेकर आणि प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई प्रेमकुमार बोके यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडली.या बैठकीमध्ये सर्वानुमते शिवमती प्रा.मिनाक्षी अमोल जगदाळे यांची निवड करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

शिवमती मिनाक्षी अमोल जगदाळे यांचे सामाजिक, राजकिय, शैक्षणिक कार्य विचारात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत, त्यांना पाच नॅशनल अवार्ड असून, ऐंशी पेक्षा जास्त बक्षिसे त्यांना मिळालेली आहेत .त्या सोलापूर विद्यापीठाच्या डायरेक्टर आहेत,तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळालेला असून, अकरा विषयात त्यांनी पदव्या मिळवल्या आहेत आणि सध्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विषयात त्यांची पीएचडी चालू आहे.

या सर्व कार्याची दखल घेऊन पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सोलापूर जिल्हा व सातारा जिल्ह्याचे त्या काम पाहतील.जिजाऊ ब्रिगेड संघटन,निवडी,बांधणी आणि विस्ताराचे काम मी करेन तसेच , विभागीय जिल्हा, तालुका, ते ग्रामशाखा सुद्धा कशा वाढतील आणि तळगळापर्यंत जिजाऊ ब्रिगेड वाढवण्याचे काम करणार असल्याचे जगदाळे म्हणाल्या.

हेही वाचा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते, त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करणार: मंगेश चिवटे

हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम

या वेळी जिजाऊ ब्रिगेड च्या सौ सीमाताई बोके, स्नेहताई खेडेकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे साहेब, प्रेमकुमार बोके,अमोलशेठ शिवाजीराव जगदाळे ,जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत,नंदाताई शिंदे, निर्मलाताई शेळवणे,अक्काताई माने, प्रियाताई नागणे, वनिता कोरटकर, हेमलता मुलिक,ताई बोराडे, समाधान ताई माने,अश्विनी पाटील,संपूर्णा सावंत, सोनाली शिंदे, उज्ज्वला कदम या महिला उपस्थित होत्या.

त्यांच्या निवडीबद्दल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!